‘उद्धव ठाकरेंचं पारडं जड, पण…’; वकील असीम सरोदेंनी फोडून सांगितलं

‘उद्धव ठाकरेंचं पारडं जड, पण…’; वकील असीम सरोदेंनी फोडून सांगितलं

Shiv Sena MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Shiv Sena MLA disqualification case) सेनेच्या दोन्ही गटांनी आपापली बाजू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे मांडली. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर नार्वेकर १० जानेवारी रोजी निकाल देणार आहेत. या निकालावर एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे. हा निकाल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने लागल्यास उद्धव ठाकरेंचे मोठं नुकसान होणार आहे. मात्र हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला तर त्याचा सर्वाधिक फटका शिंदेंना बसणार आहे. दरम्यान, नार्वेकर १० जानेवारीला काय निर्णय देतील, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे. मात्र, ठाकरे गटाचं पारडं आहे, असं विधान वकील असीम सरोदेंनी (Asim Sarode) केलं.

टीम इंडियाच्या 11 चेंडूत 6 विकेट पडल्या, 7 फलंदाज शून्यावर आऊट; अजूनही आघाडी कायम 

लेट्सअप मराठीशी बोलतांना सरोदे यांनी सांगितलं की, ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंनी जे युक्तीवाद केलेत, ते बघितलं तर कायद्याच्या दृष्टीकोनातून उद्धव ठाकरेची बाजू मजबुत आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टात २(१) ए, २(१) बी यात सांगितलं की, एखादा लोकप्रतिनिधी हा जेव्हा एखाद्या पक्ष चिन्हावर निवडून येतो, तो त्या पक्षाचा व्यक्ती असतो. विधीमंडळात जेव्हा तो लोकप्रतिनिधी जातो, तेव्हा तो विधीमडळ पक्षांर्गत काम करतो. मात्र, खऱ्या पक्षाचं महत्व जास्त असतं. कुठल्याही आमदाराचं आयुष्य पाच वर्षाचं आहे. पण, राजकीय पक्षाची नोंदणी होते, तेव्हा तो पक्ष नेहमीसाठीच राजकीय पक्ष असतो. आता पक्ष प्रमुखाच्या आदेशानुसार पक्ष चालेल, असं शिवसेनेच्या घटनेते असेल आणि त्याविरुध्द कोणी काम करत असेल तर त्यांनी स्वच्छेने तो पक्ष सोडलेला आहे असं मानलं जातं. त्यामुळं शिवसेनेवर ठाकरे गटाचा दावा राहिलं. एकूणच युक्तीवाद पाहता ठाकरेंच पारडं जड आहे.

जयंत पाटलांचं मन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रमेना? अयोध्या व्हाया भाजप नवा मार्ग 

सरोदे म्हणाले की, व्हीप मोडून कोणी काम करत असेल तर ते अपात्र ठरतात. सुनील प्रभूंच्या व्हीप हा खोटा आहे, त्यावर सही चुकीची आहे, असं शिंदे गटाने सांगितलं. अनेकांना व्हीप मिळाला नाही, असाही युक्तीवाद करण्यात आला. मात्र, सुनील प्रभूंनी स्वत: आपल्या दोन सह्या असून विधीमंडळात जे सही आपण करतो, तीच सही व्हीपवर आहे. नार्वेकर ती सही तपासू शकतात. त्यामुळं त्यांचा शिंदे गटाचा युक्तीवाद कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही.

सरोदेंना सागिलतं की, शिंदे गटाने पक्षविरोधी काम आहे. ते सुरतला फिरायला नाही, पक्षविरोधी कारवाया करायला गेले. . त्यांच्या वागणूकीतून त्यांनी ते दाखवून दिलं. त्यामुळं १० तारखेचा निर्णय ठाकरेंच्या बाजून लागेल आणि शिंदे गटाचे आममदार अपात्र ठरतील, असा विश्वास सरोदेंनी व्यक्त केला.

नार्वेकरांच्या निर्णयाआधीच जर मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी राजीनामा दिला तर त्यांच्या गटातील उरलेले सदस्यांच्या आधारे बहमत ठरवून त्यांचा मुख्यमंत्री निवडू शकतात, असही सरोदेंनी सांगितलं.

नार्वेकरांपुढं आता दोनच पर्याय आहे. एक तर ते पात्र ठरवू शकतात किंवा अपात्र. नार्वेकरांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube