टीम इंडियाच्या 11 चेंडूत 6 विकेट पडल्या, 7 फलंदाज शून्यावर आऊट; अजूनही आघाडी कायम

टीम इंडियाच्या 11 चेंडूत 6 विकेट पडल्या, 7 फलंदाज शून्यावर आऊट; अजूनही आघाडी कायम

IND VS SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यात केपटाऊनमध्ये खेळली जात असलेली दुसरी कसोटी पहिल्याच दिवशी ऐतिहासिक ठरली आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघ ऑलआऊट झाले. मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) घातक गोलंदाजी पुढं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या शेवटच्या 6 विकेट केवळ 11 चेंडूत एकही धाव न करता गेल्या. भारताच्या डावात एकूण 7 फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. भारतीय संघ पहिल्या डावात 153 धावांत ऑलआऊट झाला होता. अशा प्रकारे टीम इंडियाला 98 धावांची आघाडी मिळाली होती.

दरम्यान, एकवेळ भारतीय संघाने 153 धावांच्या स्कोअरवर केवळ 4 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर पुढील 11 चेंडूंमध्ये एकूण 6 भारतीय फलंदाज बाद झाले आणि एकही धाव जोडता आली नाही. टीम इंडियाने 33 षटकात 4 गडी गमावून 153 धावा केल्या होत्या आणि यावेळी विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर होते. डावाचे 34 वे षटक टाकणाऱ्या आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी षटकाच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला झेलबाद केले.

त्यानंतर अँगिडीच्या षटकातील दुसरा चेंडू डॉट बॉल होता. त्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर अँडिगीनेही जडेजाला झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने बुमराहला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे अँगिडीने आपल्या पहिल्या षटकात 3 विकेट घेतल्या. 34 षटकांनंतर, भारताची धावसंख्या 153/7 होती.

प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंनीच पवारांच घर फोडलं; जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका

यानंतर कागिसो रबाडाने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अर्धशतकाकडे वाटचाल करणारा कोहली 46 धावा करून बाद झाला. यानंतर रबाडाने चौथ्या चेंडूवर नॉन-स्ट्रायकर एंडला असलेला मोहम्मद सिराज धावबाद झाला. त्यानंतर पुढच्या म्हणजेच षटकाच्या पाचव्या चेंडूवर रबाडाने प्रसिद्ध कृष्णाला बाद करून डावाची सांगता केली.

सात फलंदाजांना खातेही उघडता आले नाही
भारताकडून यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसीद्ध कृष्णा हे खाते न उघडता बाद झाले. तर, मुकेश कुमार खाते न उघडता 11 वा फलंदाज म्हणून नाबाद राहिला.

जयंत पाटलांचं मन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रमेना? अयोध्या व्हाया भाजप नवा मार्ग

पहिल्या दिवसाचा खेळ संपला
केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा आहे. सध्या भारतीय संघ पहिल्या डावाच्या आधारे 36 धावांनी आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्कराम आणि डेव्हिड बेंडिंगहॅम क्रीजवर आहेत. भारताकडून मुकेश कुमारने 2 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली. पहिल्या दिवशी 23 विकेट पडल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज