Download App

‘गट गद्दारांचा असतो, आमचा तर पक्ष’; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर जहरी टीका

गट गद्दारांचा असतो, आमचा पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, या शब्दांत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे. दरम्यान, मागील वर्षीपासून शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता उद्या ठाकरे गट(Thackeray Group) आणि शिंदे गटाचा(Shinde Group) दसरा मेळावा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे(Aaditya Thackekray) यांनी आज पुणे दौरा केला. यावेळी ते बोलत होते.

…अन्यथा मीरा बोरवणकर यांच्यावर मानहाणीचा खटला दाखल करू, चाकणकरांचा इशारा

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील जनतेचा आक्रोश सध्या बाहेर पडत आहे. प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. काही दिवसांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवून लावले, असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा; दंड थोपटत अजितदादांची सरकारकडे मोठी मागणी

तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून दंगली भडकावण्याचं काम सुरु आहे. राज्यातलं सरकार हे घटनाबाह्य असून दोन जातीजातींमध्ये धर्मांमध्ये भांडणे लावण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही वाद निर्माण करुन लोकांना व्यस्त ठेवत आहे. आता मात्र, जनता त्यांना दारं दाखवणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Navratri 2023 : गरबा खेळणं पडल महागात; गुजरातमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू

राज्यातील ड्रग्ज विरोधात मोर्चा आम्हीच काढलायं. विषय आम्हीच हाती घेतलाय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅक्शन तर घ्यावी. आधी नक्की गृहमंत्र्यांनी सांगावं त्या आंदोलकांवर लाठीचार्ज कुणी केला? करायला सांगितला होता? मुख्यमंत्र्यांचा आदेश होते की उपमुख्यमंत्र्यांचे हे आधी त्यांनी स्पष्ट करावं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

‘तुमच्या पक्षाचा दाऊद अध्यक्ष अन् छोटा शकील सेक्रेटरी’; राऊतांचा फडणवीसांवर घणाघात !

दरम्यान, आमचा पक्ष आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे असून उद्या शिवतीर्थावर शिवसेनेचं दसरा मेळावा आहे. या मेळाव्याची सध्या जोरदार, जय्यत तयारी सुरु असून राज्यातून लोक येणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us