आम्ही शांत बसणार नाहीत! आता मुंबई बंद करणार, पोलिसांवर गंभीर आरोप करत आदित्य ठाकरे आक्रमक

दादरमधील शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आदित्य ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे.

News Photo   2026 10 11T185148.068

Aaditya Thackeray Protest

दिल्लीनंतर आता मुंबईतही आंदोलनावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवाजी पार्क परिसरात सीजेपीचं आंदोलन सुरू असताना मुंबई पोलिसांनी समर्थकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. यानंतर दादरमधील शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. रस्ता बंद करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून, या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला आहे.

शिवसेना भवनाबाहेर घडलेल्या या प्रकारानंतर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आंदोलनात सहभागी झाले. आदित्य ठाकरे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असताना शिवसेना भवन परिसरात मोठी गर्दी जमली. त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरूप आलं असून, परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

Exit mobile version