“आज नाही तर उद्या पण हे ४० गद्दार बाद होणार, त्यामुळे हे सरकार दीर्घकाळ टिकणार नाही” अस वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) आज पैठण मध्ये होती. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, या देशात अजुन संविधान आहे, आपण संविधान मानतो. त्यामुळे हे ४० गद्दार आज नाही तर उद्या हे बाद होणार. सर्वोच्च न्यायालयात आपली लढाई चालू आहे. त्यामुळे ज्या दिवशी निर्णय होईल तो निर्णय आपलाच होईल. कारण या देशात अजुन ‘सत्यमेव जयते’ला महत्व आहे, सत्ता’मेव’ जयते ला नाही. अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली.
सध्याच राज्यातील सरकार हे जास्त काळ टिकणार नाही. फक्त एक-दोन महिने या सरकारचा त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या राज्यात जे चित्र आहे ते बरं दिसत नाही. राज्याचे कृषी आणि उद्योग हे दोन डबल इंजिन आहेत. त्याच्या
राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर कृषीक्षेत्रावर जे संकट आले तरी तुम्ही राज्याच्या कृषिमंत्र्याला पहिले का ? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी विचारला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्रांनी तीन हजार कोटींची घोषणा केली पण शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही तर मग घोषणा केलेले पैसे गेले कुठे ? त्यातुन त्यांची खोकी भरली गेली का ? अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राज्यात सर्वच शेतकऱ्यासमोर अनेक अडचणी आहेत. पण राज्यातील एकमेव शेतकरी आहेत ज्याच्या शेतात दोन हेलिपॅड आहेत. आणि ते मंत्रालयात बसले आहेत, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.