मुंबई : दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी धक्कादायक विधान केले आहे. तुम्हाला पदवी तर मिळाली, पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, असे धक्कादायक विधान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. यामुळे उपस्थितीत पदवीधरांमध्ये मोठा गोंधळ उडाला, यानंतर सत्तारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या नोकर भरतीमध्ये तुमहाला नोकरी मिळेल, असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेह्ण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय म्हणाले सत्तार ?
वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या पदव्या घेतलेले आहेत. परंतु आता भविष्यामध्ये यानंतर आपण अनेक लोकांना इथे जे शिकले ते तर शिकले पण इथे शिकल्यानंतर तुम्ही ज्या ज्या भागात काम करणार आहात, त्या भागात तुमच्याकडं काही योगदान होणार आहे. सर्वांना काय नोकऱ्या मिळणार नाहीत आणि ज्यांना मिळणार त्यांना सर्व लोकांना अपेक्षा आहे. ‘मै जो बताया हु तो उनकी हसी खुल गई है’, लेकिन अभी जो 75 हजार नोकऱ्या मिलनेवाली हो आपके बॅच को या आपके पहले बॅच को इन लोगो को काफी सुवर्णसंधी है, असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
Maharashtra Police : फडणवीसांचे गृहखाते अजितदादांच्या रडारवर; म्हणाले, आता पोलिसांनाच..
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील दोन टक्केही खर्च झाले नाही, असे म्हणणे बरोबर नाही. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 65 कोटी, 88 लाख म्हणजे 80 टक्के पैसे खर्च झाले आहेत. 108 कोटींचा दुसरा टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून 31 मार्चपूर्वी हा निधी खर्च केला जाईल. या निधीतून 58 कोटी, 48 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चर्चेला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी हातातील कागद वाचत भाषण करण्यास सुरवात केली. त्यावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांनी वाचून उत्तर देऊ नये, असे त्यांनी सांगितले. तेव्हा, नावे चुकू नये म्हणून वाचून दाखवत असल्याचे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे नाव तरी वाचून दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. अखेर हातातील कागद बाजूला ठेवून सत्तार यांनी उत्तर दिले.