Download App

माझ्याच पक्षातील नेत्यांचा माझ्याविरोधात कट; अब्दुल सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप होत आहेत. याबाबत अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा आता रंगताना पाहायला मिळत आहे.

मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. अब्दुल सत्तार यांच्या या विधानाने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांनी एका मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचं सत्तार म्हणाले.

यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे. मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप माझ्यावर करण्यात आले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

माझ्या पक्षातील देखील काही लोकं यात असू शकतात. तर विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. माझ्यासारखा अल्पसंख्याक व्यक्ती कृषिमंत्री पदावर बसल्याने अनेकांना पाहिले जात नाही. त्यामुळे सतत माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

Tags

follow us