मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार? ते भाजपात जाणार किंवा राज्यातलं सरकार कोसळणार… असे अनेक मुद्दे गाजले होते. या प्रश्नांवरून राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया येत होत्या. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंधरा दिवस थांबा राजकारणात दोन मोठे स्फोट होणार आहेत, असा दावा केला होता.
या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांनीही याबाबत एक मोठा दावा केला होता. यानंतर त्यावर सुळे म्हणाल्या, एक नाही दोन राजकीय भूकंप होणार आहेत. एक दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू होती.
सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा
१८ एप्रिलच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी हा दावा केला होता. त्यानंतर आज त्याला १३ दिवस पूर्ण होत असतानाच आज शरद पवार यांनी राजीनामा दिला आहे.शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
पण यामुळे सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांच्या निर्णयानुसार पहिला भूकंप झाला आहे. तर दुसरा भूकंप काय होणार ? अशी चर्चा रंगली आहे. पंधरा दिवसांत जे दोन भूकंप होणार होणार असे म्हटले जात होते त्यापैकी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा हा पहिला भूकंप आहे. आता दुसरा कोणता? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.
पंधरा दिवसांत जे दोन भूकंप होणार होणार असे म्हटले जात होते त्यापैकी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा हा पहिला भूकंप आहे. आता दुसरा कोणता? #SharadPawar
— Shrimant Mane (@ShrimantManey) May 2, 2023
Ashok Chavan : पवारांनी निवृत्तीची घोषणा करणं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय
दरम्यान शरद पवार यांच्या निर्णयाची कल्पना नव्हती, असे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी सांगितले. पवारांच्या या निर्णयाने अनेक नेत्यांना रडू कोसळले. सभागृहात गोंधळ सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार हे सर्वांना शांत करत होते. त्याचवेळी अजित पवार यांनी शरद पवारांचा निर्णय माहिती असल्याचे जाहीर करून टाकले. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द ही १ मे १९६६ ला सुरू झाली होती. याच एक मेच्या दिवशी म्हणजे काल त्यांना निवृत्तीची घोषणा करायची होती. पण महाविकास आघाडीची सभा असल्याने ती एक दिवस पुढे ढकलण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगून टाकले.