Maharashtra 15 August Independence Day Flag Hoisting Minister List : गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये (Mahayuti) वाद पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरुन शिवसेनेच्या (Shivsena) भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्यात संघर्ष सुरु असल्याने आतापर्यंत रायगड पालकमंत्री पदाचा वाद महायुतीमध्ये संपलेला नाही. यातच आता रायगडमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार याबाबतचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहे तर नाशिकमध्ये भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरिश महाजन (Girish Mahajan) ध्वाजारोहण करणार आहे. याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने एक यादी जाहीर केली आहे.
तर दुसरीकडे राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. तर मंत्री अदिती तटकरे यांनी रायगडचे पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. जानेवारी 2025 मध्ये राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती मात्र काही तासानंतर रायगड आणि नाशिक पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली होती.
अभिनेते किशोर कदम अडचणीत, राहतं घर वाचवण्यासाठी CM फडणवीसांना आवाहन
या यादीत अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रिपदी तर गिरिष महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र महायुतीमध्ये सुरु असलेल्या तणावानंतर नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता.
कोणत्या शहरात कोण करणार ध्वजारोहण
1. एकनाथ शिंदे – ठाणे
2. अजित पवार – बीड
3. चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर
4. राधाकृष्ण विखेपाटील – अहिल्यानगर
5. छगन भुजबळ – गोंदिया
6. चंद्रकांत पाटील – सांगली
7. गिरीश महाजन – नाशिक
8. गणेश नाईक – पालघर
9. गुलाबराव पाटील – जळगांव
10. दादाजी भुसे – अमरावती
11. संजय राठोड – यवतमाळ
12. उदय सामंत – रत्नागिरी
13. जयकुमार रावल – धुळे
14. पंकजा मुंडे – जालना
15. अतुल सावे – नांदेड
16. डॉ. अशोक वुई – चंद्रपूर
17. शंभुराज देसाई – सातारा
18. आशिष शेलार – मुंबई उपनगर
19. दत्तात्रय भरणे – वाशिम
20. आदिती तटकरे – रायगड
21. शिवेंद्रसिंह भोसले – लातूर
22. माणिकराव कोकाटे – नंदूरबार
23. जयकुमार गोरे – सोलापूर
24. नरहरी झिरवाळ – हिंगोली
25. संजय सावकारे – भंडारा
26. संजय शिरसाट – छ. संभाजीनगर
27. प्रताप सरनाईक – धाराशिव
28. मकरंद जाधव (पाटील) – बुलढाणा
29. नितेश राणे – सिंधुदुर्ग
30. आकाश फुंडकर – अकोला
31. प्रकाश आबिटकर – कोल्हापूर
32. आशिष जयस्वाल – गडचिरोली
33. डॉ. पंकज भोयर – वर्धा
34. मेघना बोर्डीकर – परभणी
आजही पालकमंत्री पदाबाबत आम्ही ठाम – सामंत
ध्वजारोहणासाठी राज्य शासनाकडून यादी जाहीर करण्यात आल्यानंतर यावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्यांनी नाशिकमध्ये भुसे आणि रायगडच्यापालकमंत्रीपदी गोगावले यांच्यासाठी आम्ही आजही ठाम असल्याचे सांगितले. तसेच आज जी यादी प्रसिद्ध झाली ती पालकमंत्री पदासाठी नाही. तर, ध्वजारोहणसाठीची यादी आहे. मागील वेळी हीच यादी होती. त्यामुळे कुठला पालकमंत्री जाहीर झालेला नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. पण नाशिकला भुसे आणि रायगडसाठी गोगावले पालकमंत्री व्हावे अशी आजही आमची स्पष्ट भूमिका आहे. रायगड आणि नाशिकला फक्त ध्वजारोहणासाठी नाव आहे.