Download App

लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी तारीखच सांगितली…

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana February installment : लाडक्या बहिणी ( Ladki Bahin Yojana) फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी (Aditi Tatkare) यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्चला खात्यात जमा होणार, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

राज्यभरातील लाभार्थी महिलांना सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रूपये दिले जात आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे सगळ्या महिलांचं लक्ष लागलेले (Maharashtra Politics) होते. याचंच उत्तर आता मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय. त्यांनी सांगितलं की येत्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर विधीमंडळाचं विशेष सत्र होणार आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेच्या भावाचा खळबळजनक दावा, पाहा VIDEO

आदिती तटकरे म्हणाल्या की, येत्या 8 मार्च रोजी विधीमंडळाचं विशेष सत्र होणार आहे. खास महिला लोकप्रतिनिधी आणि राज्यातील महिलांसाठी हे खास सत्र आहे. याशिवाय राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत देखील जनतेला महत्त्वाची माहिती द्यायची आहे. या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या 8 मार्च रोजी वितरीत केला जाणार असल्याचं तटकरे यांनी म्हटलंय.

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत खात्यात वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर आठ मार्च रोजी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झालेले असतील. महिलादिनाच्या निमित्ताने आम्ही आठ मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलीय.

… तर नैतिक अनैतिकची व्याख्या सरकारलाच… छगन भुजबळ मुंडेच्या राजीनाम्यावर काय म्हणाले?

जगभरात दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्पष्ट केलंय, की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.

 

follow us