स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेच्या भावाचा खळबळजनक दावा, पाहा VIDEO

स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेच्या भावाचा खळबळजनक दावा, पाहा VIDEO

Swargate Rape Case Latest Update : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये तरूणीवर बलात्कार (Swargate Rape Case) झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला ताब्यात घेतलंय. घटनेची सखोल चौकशी केली जातेय. तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत (Pune News) आहेत. स्वारगेट डेपोमध्ये घटना घडण्याअगोदर दत्ता गाडे (Datta Gade) हा गुलटेकडीमध्ये भाजी विकत असल्याचं समोर येतंय. यानंतर दत्ता गाडेच्या कुटुंबाने केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणात ट्विस्ट येताना दिसत आहे.

माझे आई-वडिल आणि माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. गावकरी, नातेवाईक शेजारी आमच्यासोबत कोणताही संबंध ठेवण्यास तयार नाही.आमच्यावर बहिष्कार टाकण्यात आलाय. घडलेलं प्रकरण चुकीचं (Pune Crime) आहे. परंतु आमच्या भावावरील गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाहीये, असा दावा स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या भावाने केलाय. आमचा भाऊ काय करतो, याची काहीही कल्पना अगोदर नव्हती. आम्हाला गुन्हे दाखल झाल्यानंतर समजलंय, असं ते म्हणाले आहेत. घटनेनंतर दत्ता गाडे घरी आला होता, असं देखील दत्ता गाडेच्या भावाने स्पष्ट केलंय.

…अन्यथा माझी डेडबॉडी परळीला येईल; महादेव मुंडे यांच्या पत्नीचं टोकाच पाऊल..आजपासून उपोषण

तर दत्तात्रय गाडेच्या मामाचा मुलगा बोलताना म्हटला की, पाच-सहा गुन्ह्यांमध्ये मी स्वत: जामिनदार आहे. एका गुन्ह्यात त्याला पोलिसांनी उचललं. त्यानंतर तीन-चार गुन्हे त्याच्यावर नोंदविण्यात आलेत. एका गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता देखील झालेली आहे. या प्रकरणात आम्ही सोशल मीडियावर सीसीटीव्ही बघितलाय. ती लेडीज त्याला अगोदर घेवून बसमध्ये गेलीय. ती मुलगी सुशिक्षित आहे. तिचे कपडे फाटलेले नाही, तिने काहीही आरडाओरडा देखील केलेला नाही. तिने तीन तासानंतर मित्रांच्या मदतीने पोलीस केस दिलीय.

Video : आता बोलायला सगळे मार्ग मोकळे झालेत; परब अन् चंद्रकांतदादांच्या संवादाने फुटली नवी पालवी

दत्ता गाडेचं कुटुंब मागणी करत आहे की, प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर मीडियाने नाण्याची दुसरी बाजू सुद्धा दाखवावी. या घटनेमुळे गावातील लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. घटना घडल्यानंतर दत्ता गाडे घरी आला होता. परंतु तो काही बोलला नाही, असं देखील माध्यमांसमोर दत्ता गाडेच्या भावाने म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube