Video : आता बोलायला सगळे मार्ग मोकळे झालेत; परब अन् चंद्रकांतदादांच्या संवादाने फुटली नवी पालवी

Video : आता बोलायला सगळे मार्ग मोकळे झालेत; परब अन् चंद्रकांतदादांच्या संवादाने फुटली नवी पालवी

Chandrakant Patil : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. (Chandrakant Patil) पण त्याआधीच भाजप आणि ठाकरे गटाचे नेत्यांची भेट झाली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांची खास भेट घेतली. आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. चंद्रकांत पाटील हे ठाकरे गटाच्या नेत्यांना भेट देण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांना खास गिफ्ट दिलं.

जितेंद्र आव्हाडांना अटक झाली का?, दोन्ही हातात बेड्या का घातल्या? नक्की काय घडलं?

चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना चॉकलेट भेट दिली. यावेळचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांना चंद्रकांत पाटील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भेटले अन् चॉकलेट भेट दिली. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरले, आरोप करत मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube