ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यावर नोंदणी झाली आहे. अनेक गावात नोंदणीसाठी कँपही चालवले आहेत. तसंच, अेक ठिकाणी मोठे मोठे फलक लावून त्यावर याविषयी माहिती देण्यात आली आहे. मात्र, यावरून विरोधकांकडून टीकाही होत आहे. (ladki Bahin Yojna) त्याला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उत्तर देत असतात. आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आकडेवारी देतच याविषयी माहिती दिली आहे.
अहवालात केलेले आरोप काही प्रमाणात सेबी प्रमुखांनी मान्य केले; हिंडेनबर्गच्या दाव्याने पुन्हा खळबळ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली. यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटरवरुन दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 76 हजार 091 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विट करून दिली आहे. तसंच अर्जांची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरली आहेत असही त्यांनी यामध्ये सांगितलं आहे.
SEBI: ..मग अध्यक्षांनी राजीनामा का दिला नाही?, राहुल गांधींची सेबीच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती
नोंदणी केलेल्या महिलांचा आकडा आणि पात्र उमेदवारांचा आकडा पाहता साधारण अंदाजे 11 लाख 45 हजार 235 अर्ज बाद ठरल्याची शक्यता आहे. दरम्यान, यामध्ये पात्र अपात्र हे पाहता येतं. तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस नारीशक्ती दूत अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारीशक्ती दूत अॅप मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे. यामध्ये तुम्ही केलेले अर्ज दाखवण्यात येतील. आपल्याला ज्या अर्जाचे स्टेटस पहायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्य स्थिति तिथं पाहायला मिळते.
लाभार्थी स्थिती
सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल. या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील. सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींकडून उदंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ७६ हजार ०९१ महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. या अर्जांची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ३० हजार ७८४ अर्ज पात्र झाली…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 11, 2024