लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आजपासून खात्यात जमा ‘इतके’ पैसे; आदिती तटकरेंची मोठी घोषणा 

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची लोकप्रिय योजनांपैकी एक असणारी लाडकी बहीण योजनेवर एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार

  • Written By: Published:
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची लोकप्रिय योजनांपैकी एक असणारी लाडकी बहीण योजनेवर एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून विचारणा होत होती मात्र आता मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा करत पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती दिली आहे.  तसेच त्यांनी या योजनेसाठी पात्र महिलांनी केवायसी देखील करुन घ्यावी असं देखील आवाहन केले आहे.

मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी एक्सवर पोस्ट करत ऑक्टोबर महिन्याचा (Ladki Bahin Yojana) हप्ता पात्र महिलांना मिळण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती दिली आहे. तसेच या योजनेसाठी मागच्या महिन्यापासून सुरु झालेली केवायसी प्रक्रियापूर्ण करुन घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे.

ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती ! असं आदिती तटकरे यांनी एक्सवर म्हटलं आहे.

महाराष्ट्रावर पुन्हा आस्मानी संकट, IMD कडून चक्रीवादळाचा अलर्ट

follow us