महाराष्ट्रावर पुन्हा आस्मानी संकट, IMD कडून चक्रीवादळाचा अलर्ट
Maharashtra Cyclone Alert : राज्यात मोंथा चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. सोमवारी अहिल्यानगरसह
          Maharashtra Cyclone Alert : राज्यात मोंथा चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. सोमवारी अहिल्यानगरसह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिल्याने राज्यातील काही भागात धो धो पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD Alert) अंदमान आणि निकोबार (Andaman And Nicobar) बेटांसाठी चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ 4 नोव्हेंबरपासून तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रासह (Maharashtra) अनेक राज्यांना बसण्याची शक्यता आहे. राज्यात या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळामुळे राज्यातील किनारी भागात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांसाठी हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आले आहे.
2 नोव्हेंबर सकाळी 8.30 पासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या म्यानमार किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास सुरुवात झाली होती. 4 नोव्हेंबरपासून चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.
व्यवसायात होणार फायदा अन् मिळणार प्रियजनांचे सहर्काय; जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस
पुढील 48 तासांत हे चक्रीवादळ म्यानमार – बांगलादेश किनाऱ्याच्या उत्तरेकडे आणि वायव्येकडे सरकण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
