Maharashtra Rain Alert : पुढील आठवड्यातही पाऊस बरसणार, हवामान विभागाने काय अंदाज दिला?

राज्यातील अनेक भागांत पुढील दोन दिवसांसह पुढील आठवड्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.

Weather Update

Maharshtra Rain Update : मागील अनेक दिवसांपासून पावसाने थांबायचं काही नावंच घेतलं नसल्याचं पाहायला मिळालं. नवरात्र, दसरा अन् आता दिवाळीतही जोरदार पाऊस बरसत आहे. अशातच राज्यातील अनेक भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पुढील काही दिवस पावसाचे (Maharshtra Rain Update) ढग कायम राहणार असल्याचा इशाराच हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवस पुण्यासह राज्यातील इतर भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 48 तासांसाठी मुंबईसह उपनगरांना वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलायं.

रोहित-कोहलीचा ‘दिवाळी धमाका’ ! तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया हरविले, कोहलीच्या नावावर मोठा विक्रम

राज्यातील अनेक भागांत आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात काही भागांत आज पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, रायगड, मध्य मध्य महाराष्ट्र, सोलापूर, पुणे, आहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, नांदेड या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

दहशतवादाला फंडिंग अन् मनी लॉन्ड्रींग, नॉर्थ कोरिया, ईरान आणि म्यानमारला FATF ने टाकलं ब्लॅक लिस्टमध्ये

मुंबईतील अरबी समुद्रातसह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यात बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलायं. तसेच बंगालच्या उपसागरातील क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतरण होणार असून समुद्रातील क्षेत्रामुळे मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशारा देण्यात आलायं.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! मुलं रद्द करू शकणार पालकांनी बालपणीच परस्पर विकलेल्या संपत्तीचे सौदे

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील तीव्र दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी चक्रीवादळात रूपांतर होईल. मंगळवारी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकेल. त्यामुळे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मुंबईपासून 450 किमीवर आहे. त्याचे रूपांतर कदाचित तीव्र दाबाच्या क्षेत्रात होईल.

follow us