ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Ladki Bahin Yojana June Installement : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जून महिन्याचा सन्मान निधी प्राप्त करण्याची प्रतीक्षा आता संपली (Maharashtra Goverment) असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये हा निधी उद्यापासून क्रमाक्रमाने जमा होणार आहे. योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार (Mahayuti Sarkar) असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लागणार आहे. यासंदर्भात अधिकृत पोस्ट महिला अन् बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या X अकाऊंटवर केली आहे.

Video : अजित पवारांना ‘ती गोष्ट’ माहिती होती; बीडच्या खासदारांचा मोठा गोप्यस्फोट

जून महिन्याचा सन्मान निधी

या संदर्भात महिला अन् बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, महायुती सरकारचा ठाम निर्धार, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सातत्याने मिळणारे मार्गदर्शन आणि (Maharashtra Politics) राज्यातील लाडक्या बहिणींचा मिळणारा भरवसा या सगळ्यांमुळे ही योजना अधिक प्रभावीपणे पुढे नेली जात आहे.

या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने सरकारचा एक ठोस पाऊल असल्याचेही तटकरे यांनी नमूद केलंय. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत विशेष गती आणण्यात आली आहे. योजनेत नोंदणीकृत असलेल्या सर्व पात्र महिलांना दर महिन्याला निश्चित रक्कम सन्मान निधी स्वरूपात दिली जाते. यामुळे महिलांना घरखर्च, शिक्षण, आरोग्य यांसारख्या गरजांसाठी थोडाफार आर्थिक आधार मिळतो.

हेल्पलाइन सेवा…

राज्यातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली आहे. महिलांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी लिंक असणे गरजेचे आहे. या तांत्रिक प्रक्रियेनंतरच सन्मान निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जातो. यामध्ये कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाची गरज नाही, हे सरकार वारंवार स्पष्ट करतंय.

‘जय गुजरात’ घोषणेचं राजकारण, शिंदेंचा ‘त्या’ व्हिडिओ अन् फोटोसह ठाकरेंवर प्रतिवार

राज्यभरातून आलेल्या प्रतिसादावरून हे स्पष्ट होत आहे की, ही योजना महिलांमध्ये लोकप्रिय झाली आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनात हळूहळू वाढ होतेय. ग्रामीण भागातील महिला सुद्धा या योजनेचा लाभ सहजपणे घेत आहेत. महिला आणि बालकल्याण विभाग, जिल्हा प्रशासन आणि पंचायत समिती यांच्याद्वारे योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवलं जातंय. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, म्हणून हेल्पलाइन सेवा आणि माहिती केंद्र कार्यरत करण्यात आलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube