Video : अजित पवारांना ‘ती गोष्ट’ माहिती होती; बीडच्या खासदारांचा मोठा गोप्यस्फोट

MP Bajrang Sonawane Exclusive : बीड जिल्ह्यातील सामाजिक स्थिती आणि राजकीय स्थिती गेल्या अनेक दिवसांत महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेली आहे. मराठा आरक्षण या विषयाने सुरूवात झाली. (Sonawane) पुढे दोन समाजात संघर्ष उभा राहिल्याचंही वातावरण झालं. त्याच काळात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला. त्यानंतर राज्यभर बीड गाजलं. दरम्यान, या सगळ्या विषयांवर लेट्सअप मराठीने खासादर बजरंग सोनवणे यांची मुलाखत घेतली आहे.
खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमाअंतर्गत खासदार सोनवणे यांना अनेक प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी सविस्त उत्तर दिली. यामध्ये सोनवणे म्हणाले, माझ्या संपूर्ण कुटुंबात कुणी राजकारणात नव्हत. मी पहिला आहे जो राजकारणात आलो. त्यामुळे मला लोकांना या पदावर बसवलय. तर मी लोकांची दिवसरात्र सेवा करतो. बाकी, सामाजिक आणि राजकीय वातावरण काहीही असलं तरी ते शांत ठेऊ आपल्या लोकांचे रस्ते, रेल्वे, विमानतळ हे प्रश्न कसे सोडवता येतील यावर माझा जास्त भल आहे असं ते यावेळी म्हणाले.
तर राजीनामा देईल, थेट पत्रकार परिषदेत खासदार बजरंग सोनवणे असं का म्हणाले?
त्यांना जातीयवाद आणि सामाजिक संघर्ष असा प्रश्न विचारला असताना ते म्हणाले काही लोकांना जातीचा प्रश्न पेटवत ठेवल्याशिवाय राजकारणच करता येत नाही. त्यामुळे ते लोक असं राजकारण करतात. मात्र, मी त्यामध्ये पडत नाही. त्याचबरोबर त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य करताना सांगितलं की, मी या आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा दयेचा अर्ज फेटाळेपर्यंत मी या हत्येतील सर्वांना फाशीच व्हावी अशी मागणी करणार असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांना तुम्ही अजित पवार गटातून शरद पवार गटात गेले म्हणून अजित पवार सहकार्य करतात का असं विचारलं, त्यावर बोलताना सोनवणे म्हणाले, अजित पवार यांना माहिती होत मी शरद पवार गटात जाणार आहे आणि खासदार होणार आहे. त्यांच्या या दाव्यामुळं अजित पवार यांच्यावर आता लोक संशय घेण्याची शक्यता आहे. कारण, हे माहिती असताना असं कसं होऊ दिल अशी उलट-सुलट चर्चाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि आजित पवार गट हे एकच आहेत का? अशीही चर्चा सुरू झाली आहे.