‘जय गुजरात’ घोषणेचं राजकारण, शिंदेंचा ‘त्या’ व्हिडिओ अन् फोटोसह ठाकरेंवर प्रतिवार

Eknath Shinde on Jai Gujarat Slogan : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेबाबत जोरदार राजकारण तापलं आहे. मनसे, शिवसेना उबाठा यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते, संघटना रस्त्यावर उतरली. त्यांतर सरकारने काढलेले जीआर मागेही घेतला. त्यानंतरही आता नवे वाद समोर येत आहे. (Gujarat) आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली. त्यामुळे आता राजकारण तापलं असून विरोधकांनी जोरदार प्रहार सुरू केला आहे. त्या सगळ्यावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे.
काय म्हणाले शिंदे?
मराठी म्हणजे आमचा श्वास आहे, हिंदू धर्म म्हणजे आमचा आत्मा आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, जे आमच्यावर बोलत आहेत, त्यांनी जरा आरशात पहावं. मराठी भाषेबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण केलं जात आहे असं म्हणत गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? असा थेट सवाल शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
एकनाथ शिंदेंचं जय गुजरात! फडणवीसांकडून पाठिंबा पण, अजितदादांनी गुगली टाकलीच, म्हणाले..
त्याचबरोबर आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांची माणसं आहोत. आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि आनंद दिघे यांच्या विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे मी आधी जय हिंद म्हणालो, जय महाराष्ट्र म्हणालो आणि त्यानतंर गुजराती लोकांचा कार्यक्रम असल्याने त्यांच्या प्रोस्तानासाठी मी जय गुजरात म्हणालो असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओ
एकनाथ शिंदे यांनी यावेळी ‘उद्धव ठाकरेंचा जुना एक व्हिडिओ दाखवला, ज्यात उद्धव ठाकरे हेही जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं म्हणत आहे. तसंच, शिंदेंनी आणखी एक पत्र दाखवलं, ज्यात मुंबई मा जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंचा एक पोस्टर दाखवत त्यावर केम छो वरळी असं लिहिलेलं आहे त्यामुळे वार प्रतिवार सध्या सुरू असल्याचं दिसतय.