Aditya Thackeray Buldhana Speech : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर बुलढाण्यात खेडेकर यांच्या समर्थनार्थ एक सभा झाली. या सभेत बोलतांना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) भाजप सरकावर जोरदार हल्लाबोल केला.
‘ज्यांनी दादांची साथ सोडली ते जनतेची साथ काय देणार’; विखेंची लंकेंवर जहरी टीका
आता जनेतला बदल हवाय
खेडेकर यांनी आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, यावेळी आयोजित सभेला संबोधित करतांना आदित्य ठाकरेंनी महायुतीचे सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे लढत देत आहेत, ते आपला विजय नक्कीच आहे. कारण देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. प्रत्येक राज्यात इंडिया आघाडीच्या सभांना गर्दी होतेय. लोक आपल्याला आशिर्वाद देण्यासाठी गर्दी करतात. कारण भाजप सरकारच्या दहा वर्षाच्या काळात जनता त्रस्त झाली. आता जनेतला बदल हवाय, आणि तो बदल जनता घडणवार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
‘साखरपुडा झाला पण, लग्न झालं नाही, हातकणंगलेची चर्चा कुठं अडली?’ सतेज पाटलांनी काय सांगितलं?
ते म्हणाले, आम्ही भाजपसोबत होतो. देशात भाजप काहीतरी चांगलं करेल, असं वाटलं. मात्र, सत्तेत आल्यानंतर भाजपने केवळ कॉग्रेसवर टीका केली. ६५ वर्षात कॉंग्रेसने काय केलं, हे भाजपा विचारत होता. आता दहा वर्षापासून मोदी सत्तेत आहेत, त्यांनी काय विकास केला? असा परखड सवाल आदित्य य़ांनी केला.
शेतकरी त्रस्त आहेत. हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. मात्र, मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले, अश्रूधुराचा वापर केला. शेतकरी काही अतिरेकी नाहीत, गुंड नाहीत. मात्र, चीनी लोकांना रोखण्यासाठी जे करायला पाहिजे, ते प्रयोग भाजप सरकारने शेतकऱ्यांवर केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. .
माझा आवाज कोणी दाब शकत नाही. मिंधेंनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पण मीच त्यांना दाबून ठेवलं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजपने शेतकरी हितासाठी काही केलं. शेतकऱ्यांवर जेव्हा नैसर्गिक संकटे आली, तेव्हा भाजपने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कधी तुमच्या बांधावर सत्ताधारी आले नाही. मात्र, तुमच्या बांधावर आता त्यांचे होर्डिंग्स लागलीत, असा टोलाही त्यांनी लगावला.