‘ज्यांनी दादांची साथ सोडली ते जनतेची साथ काय देणार’; विखेंची लंकेंवर जहरी टीका

‘ज्यांनी दादांची साथ सोडली ते जनतेची साथ काय देणार’; विखेंची लंकेंवर जहरी टीका

Sujay Vikhe On Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. नगर दक्षिणेमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) विरुद्ध सुजय विखे (Sujay Vikhe) असा सामना होणार आहे. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी आठ महिन्यापूर्वी अजितदादांबरोबर जाण्याची भूमिका घेतली. दादांकडून निधी घेतला आणि त्यांना देखील सोडून दिलं असे लोक जनतेला देखील सोडून देतील यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, अशा शब्दांत विखे यांनी निलेश लंके यांचं नमोउल्लेख टाळत जोरदार निशाणा साधला.

लग्नाच्या चर्चांमध्येच तापसीचा पहिला व्हिडिओ समोर, नेटकऱ्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे नगर दक्षिणेतील उमेदवार असलेले निलेश लंके यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आठ महिन्यापूर्वी अजितदादांनी जी भूमिका घेतली त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेणाऱ्यांनी आठ महिन्यातच अजित दादांची साथ सोडले. दादांसोबत गेले निधी घेतला आणि त्यांना सोडून पुन्हा दुसरीकडे गेले अशी लोक जनतेला देखील सोडतील याबाबत काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही, या शब्दांत विखे यांनी निलेश लंके यांचा नामोल्लेख टाळत जोरदार टीका केली.

महादेव जानकरांचे पुतणे लोकसभेच्या रिंगणात, माढ्यातून निवडणूक लढणार असल्याची केली घोषणा

विरोधकांवर सडकून टीका…
गेले अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते. मात्र, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणता विकास काम केली. एमआयडीसी आणू अशी भाषण केले जाते, तुमचं सरकार असताना या सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याकडे होते. आज माझा पवारांना सवाल आहे की, त्यांचे उमेदवार आज गावोगावी एमआयडीसी आणण्याचा भाषण करतायेत. मात्र, तुम्ही तरी गेल्या अडीच वर्षात एखादा जिल्ह्याला प्रकल्प आणू शकला का? अशा शब्दांत मंत्री विखे यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.

आज कुकडीचे पाणी आपल्याला का मिळत नाही दुष्काळी भागाला पाणी येऊ द्यायचे नाही अशी काहींची भूमिका होती या पापाचे धनी कोण? आज कृष्ण खोऱ्याचे पाणी पाथर्डीसारख्या तालुक्यात येते. यांनी विकासकामे नाहीतर फक्त भांडण लावण्याची काम केले अशा उमेदवाराकडून आपण दुसरी काय अपेक्षा करणार? असंही विखे म्हणाले आहेत.

जाणता राजाला शक्य झाले नाही ते मी केलं…
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद माझ्याकडे आहे. या पूर्वीचे मंत्र्यांना कधी शक्य झाले नाही. नगर जिल्ह्यातील एमआयडीसीसाठी महसूल विभागाच्या जमिनी विनामूल्य देण्यात आल्या. यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये मोठा रोजगार निर्माण होणार आहे. एमआयडीसी आपण ठेकेदारीसाठी आणायची का? आपण आपल्या बगलबच्चांना संभाळण्यासाठी आणायची? अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

मंत्री विखेंचा सुजयला सल्ला…
नगर दक्षिणेंमधून महाविकास आघाडीकडून निलेश लंके हे सुजय विखे यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच लंके यांच्याकडून विखेंवर जोरदार टीका टिप्पणी करण्यात येत आहे. यावर मंत्री विखे यांनी सुजय विखे यांना सल्ला देत म्हणाले, समोरील प्रतिस्पर्धी उमेदवारावर फार काही भाष्य करणे गरजेचे नाही. डोंगराएवढी विकास कामे आपण केलेली आहेत, अशा शब्दात विखे यांनी लंकेंवरती निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज