Download App

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे ‘हे’ गंभीर पाऊल उचलण्याच्या तयारीत

  • Written By: Last Updated:

मुंबई : दिशा सालियन प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारनं एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय या प्रकरणावरून भाजप आणि शिंदे गटाचे नेते सातत्यानं आदित्य ठाकरेंवर आरोप करत आहेत. आता या प्रकरणी आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तरं देण्याच्या तयारीत आहेत. आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे.

वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. या आरोपांविरोधात ते कोर्टात दाद मागण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दिशा सालियान प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे.

तर दुसरीकडे याच प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची व्यूव्हरचना आदित्य ठाकरे यांनी आखल्याचं कळतं. आदित्य ठाकरे आरोप करणाऱ्यांना कायदेशीर उत्तरं देण्याच्या तयारीत आहेत. आदित्य आरोप करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या सगळ्या प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद उमटत आहेत.

गेल्या आठवड्यात विधिमंडळ कामकाजदरम्यान दिशा सालियन प्रकरण समोर आलं. या प्रकरणी एसआयटी चौकशी नेमण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारनं घेरण्याचा प्रयत्न केला होता. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाची ताकत वाढावी आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीमागे नैतिक पाठबळ उभं करावं. आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई हे नागपुरात येत आहेत.

Tags

follow us