Download App

Maharashtra Politics : ‘शिंदे गटाचे घोटाळे…., संदीपान भुमरेंनी आदित्य ठाकरेंना सुनावलं

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session) आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळेल. दरम्यान, माजी मंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सातत्याने शिंदे गटावर (Shinde group) टीका करताना दिसत आहेत. (Maharashtra Politics) आजही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.

यावर संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) म्हणाले की, भाजपला बदनाम करु नका, किमान एखादा घोटाळा तरी सिद्ध करा, नंतर बोला, विनाकारण मित्रपक्ष म्हणायचं आमी एक वेगळ्या दिशेला प्रकरण करायचं, आणि कुठे तरी जनतेला चुकीची माहिती द्यायची, आणि जनतेत गैरसमज पसरावाचं काम आदित्य ठाकरे करत असतात, असे संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं.

मराठीसाठी मुख्यमंत्री करणार दिल्लीवारी; अभिजात दर्जासाठी मोदींना भेटणार

देवेंद्र फडणवीसांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा आणि तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली होती. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करण्याची अनेक कारणे दिली आहेत. आता मागच्या सहा महिन्यात गद्दारी करण्याचे हे बारावं कारण त्यांनी दिलंय. आता काय बोलणार? जे गद्दार आहेत ते गद्दारच राहणार, त्यांच्यावरचा गद्दारीचा शिक्का कधीही पुसला जाणार नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

Tags

follow us