Download App

Aditya Thackery यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Aditya Thackery : ठाकरे गटाचे आमदार आणि नेते अदित्य ठाकरे (Aditya Thackery) यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन एम जोशी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई महानगरपालिकेच्या रोड डिपार्टमेंट करून तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

Jammu Kashmir मध्ये सैन्याची मोठी कारवाई; 5 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

डिलाई रोडवर असलेल्या पुलाच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण डिलाई रोडवर इतर काम अपूर्ण असताना आणि सात दिवसानंतर या लेनचे काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महानगरपालिकेने केलेला असताना. अशा प्रकारे अर्धवट कामाचे बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Horoscope Today: ‘वृषभ’ राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे!

दरम्यान या उद्धाटनानंतर हा रोड सुरू देखील करण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच बेकायदेशीर उद्धाटन आणि आता अशा अपुर्ण कामामध्ये रस्ता सुरू झाल्याने ही बाब सामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या उद्धाटनाविरोधात मुंबई महानगर पालिकेचे रस्ते विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे.

दिशा सालियान प्रकरणी ठाकरेंकडून कॅव्हेट दाखल

दिशा सालियन (Disha Salian) आणि सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) या दोघांच्या मृत्यू प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) गंभीर आरोप झाले होते. विधाभवन परिसरातही त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली होती. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय. याप्रकरणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज