Download App

Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंचं नाव घेतल्यावर थुंकल्याच्या कृतीचं वाईट वाटलं?

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : आपल्या वक्तव्याने सतत वादात राहणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारतात राऊत कॅमेऱ्यासमोर थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृतीमुळं चांगलंच राजकारण तापलं होतं. राऊतांच्या या कृत्याविषयी शिंदे गट चांगलचा आक्रमक झाला असून शिंदे गटाकडून अजूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता यावर राऊतांनी सावरासावर केली. अचानक जीभ दाताखाली आल्यानं मी थुंकलो, असं राऊत म्हणाले. (After hearing Srikanth Shinde’s name, did you feel bad about the act of spitting?)

मुंबईतकच्या मुलाखतीमध्ये पत्रकारांनी राऊतांना ऑन कॅमेरा थुंकण्याच्या कृतीविषयी विचारले. त्यावर राऊत यांनी सांगितले की, रस्त्यावर थुंकण्यावर बंदी आहे. कुणाच्या तोंडावर बंदी आहे का, असा खोचक सवाल केला. अचानक जीभ दाताखाली येते, किंवा जीभ चावली जाते. त्यावेळीही असंच काही झालं. काही लोकांची नावे समोर आली आणि जीभ दाताखाली आली, म्हणून मी थुंकलो, असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंचं नाव घेतल्यावर थुंकल्याच्या कृतीचं वाईट वाटलं? 

श्रीकांत शिंदे यांचे नाव ऐकतात राऊत ऑन कॅमेरा थुंकल्याने त्यांच्यावर टीका झाली. राऊतांमुळं राजकीय संस्कृती खालावली, अशी टीका त्यांच्या विरोधकांनी केली. याच संदर्भात पत्रकारांनी विचारले की, आपल्या प्रतिस्पर्ध्याला लक्ष्य करण्यासाठी अनेकदा पातळी सोडून बोलल्या जातं. तुम्ही रोज टीव्हीवर बोलता, मग त्याला नितेश राणे उत्तर देतात, तुमच्या कृतीमुळं राजकीय वातावरण बिघडलं जातंय का? अशा थेट विचारलेल्या प्रश्नाला राऊतांनी उत्तर देतांना सांगितलं की, मी कुणाच्या स्पर्धेत नाही, मी कोणत्या पत्रकाराला कधी फोन करून माझ्याकडे बोलावत नाही. तुम्ही यायचं बंद केलं, तर माझं बोलणं बंद होईल. मी माझी पक्षाची भूमिका मांडतो. मी माझी वैयक्तिक बोलत नाही.

थुंकणं ही पक्षाची भूमिका आहे का, असं विचारलं तेव्हा राऊत म्हणाले, हे येणारा काळ ठरवेल. मात्र, माझ्या कृतीमुळं वातावरण बिघडलेलं नाही. जे झालं ते झालं आता, त्यावर कशाचा चर्चा, असं राऊत म्हणाले.

Tags

follow us