विधी आणि न्याय मंत्रालयात कॉपी होल्डर पदांची भरती, महिन्याला मिळणार 63,000 रुपये पगार

विधी आणि न्याय मंत्रालयात कॉपी होल्डर पदांची भरती, महिन्याला मिळणार 63,000 रुपये पगार

Copy Holder Job : विधी आणि न्याय मंत्रालयात (Ministry of Law and Justice) रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पोस्टचे नाव कॉपी होल्डर (Copy Holder) आहे. प्रतिनियुक्ती/ कायम करणे या आधारावर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या संदर्भातील जाहिरात 25 मे 2023 रोजी जारी करण्यात आली आहे. या तारखेपासून पुढील 60 दिवसांच्या आत उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, रिक्त पदे, अर्ज कसा करावा, वेतन आणि वयोमर्यादा याविषयी सविस्तर माहिती नोटिफिकेशमध्ये देण्यात आली. (Recruitment for the post of Copy Holder in Ministry of Law and Justice)

पदाचे नाव आणि तपशील-
विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, कायदा आणि न्याय मंत्रालयात कॉपी होल्डर पदासाठी प्रतिनियुक्ती/कायम करणं या आधारावर भरली जातील. कामाचे ठिकाण नवी दिल्ली असेल

पोस्टिंग ठिकाण: नवी दिल्ली

पगार –
पे लेव्हल – दुसऱ्या पे मेट्रिक्समध्ये 7 व्या सीसीपीनुसार प्रतिनियुक्ती/कायम करणं याआधारावर 19000 ते 63,200 रुपये मासिक वेतन दिलं जाईल.

वयोमर्यादा –
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे कमाल वय 56 वर्ष असावं.

पात्रता-
विशेष आवश्यकता: केंद्र सरकार, संरक्षण दल, केंद्रीय पोलीस संघटना, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासन अंतर्गत अधिकारी जे –
भारत सरकारच्या प्रेसमध्ये किंवा कोणत्याही मंत्रालय/विभागात तत्सम पदावर नियमितपणे काम केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
कायदा आणि न्याय मंत्रालयातील गट ‘क’ पदावर नियमितपणे काम करणारे कर्मचारी (सफाई कर्मचारी) अर्ज करू शकतात. त्यांना संगणकाचे ज्ञान असावे.

भाई जगताप यांना हटवून वर्षा गायकवाड अध्यक्ष, जगताप यांची गच्छंती का? 

शैक्षणिक पात्रता-
(i) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण;
(i) इंग्रजीमध्ये किमान 35 शब्द प्रति मिनिट टाइप करण्यास सक्षम असावे

इतर पात्रता-
(i) प्रिंटिंग प्रेसमध्ये किंवा वृत्तपत्र कार्यालयात इंग्रजी कॉपी होल्डिंग किंवा प्रूफ रीडिंगच्या कामाचा अनुभव
(ii) हिंदीचे भाषेचे किमान ज्ञान.

निवड प्रक्रिया-
उमेदवारांची प्रतिनियुक्ती/कायम करणं आधारावर निवड केली जाईल.

अर्ज कसा करायचा
विधी आणि न्याय मंत्रालयात कॉपी होल्डर पदासाठी इच्छुक पात्र उमेदवार योग्य चॅनेलद्वारे दिलेल्या प्रोफॉर्मामध्ये त्यांचे अर्ज पाठवू शकतात. हे अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसांच्या आत करता येतील. अर्ज पाठवताना श्री. उत्तम प्रकाश, उपसचिव (प्रशासन), विधी विभाग, कायदा व न्याय मंत्रालय, कक्ष क्र. 411, ए-विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली 110 001 या पत्यावर पाठवावे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा : https://cdnbbsr.s3waas.gov.in/s380537a945c7aaa788ccfcdf1b99b5d8f/uploads/2023/05/2023052934.pdf

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube