Download App

Cabinet Expansion : शिंदे-फडणवीसांच्या दिल्लीतील खलबतांनंतर बच्चू कडूंचं थेट विधान; म्हणाले, अभी नहीं तो कभी नहीं

Bachhu Kadu On Cabinet Expansion : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी रविवारी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांची भेट घेतली. रात्री उशीरा ही भेट झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एएनआय या वृत्त वाहिनीशी बोलताना या भेटीत काय चर्चा झाली? याची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
( After Shinde-Fadanvis Meeting in Delhi Bachhu Kadu says If Cabinet not Expanded before 20th June… )

अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदेंचं मोठं वक्तव्य; आगामी निवडणुकीबाबत केला ‘हा’ दावा

ते म्हणाले राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. यावेळी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. अमितभाईंशी या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे मंत्रीमंडळाचा निर्णय लवकरच होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

शिरसाटांनी सांगितला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त; ‘या’ तारखेच्या आत होणार मंत्री

त्यानंतर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारावर भाकीत केलं आहे. ते म्हणाले, आता वीस तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला तर ठीक नाहीतर 2024 नंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे मंत्रिमंडळ विस्तार हा खरचं होणार की, नाही. असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या ऐकून आता वीट आल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आता खरच होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारला पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंतर याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

या निर्णयानंतर बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट झाला असलाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार प्रतिक्षेत आहेत. तो योग्य वेळी पण लवकरच होणार असल्याचा दावा शिंदे-फडणवीस करत आहेत. अशात बच्चू कडूही मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रही आहेत. त्यांनी हा विस्तार होत नसल्याने नाराजी व्यक्त करत थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

Tags

follow us