Download App

अहिल्यानगरमध्ये कोतकरांना मोठा दणका! नेप्ती बाजार समितीवरून नाव हटवलं

  • Written By: Last Updated:

Ahilyanagar Agricultural Produce Market Committee Name : अहिल्यानगर (Ahilyanagar) कृषी उत्पन्न बाजार समितीला काही दिवसांपूर्वी भानुदास कोतकर (Bhanudas Kotkar) यांचे नाव देण्यात आले होते. नामकरण सोहळ्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला (Agricultural Market Committee) होता. विशेष म्हणजे यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार अरुण जगताप यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती.

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना ‘शिशमहल’वर किती झाला खर्च?, धक्कादायक माहिती समोर

मात्र या नामकरणाच्या सोहळ्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक तसेच कोतकर यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे अमोल येवले यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी तक्रार करत या नामांतरावर आक्षेप घेतला (Ahilyanagar News) होता. त्यावर उपनिबंधक गणेश पुरी यांनी कारवाई करत आदेश काढला व कोतकर यांना धक्का दिला आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार कोतकर यांच्या नावाचा फलक काढून घेण्याचे लेखी आदेश बाजार समितीला दिले आहेत. यामुळे कोतकर यांना हा मोठा दणका असल्याचे मानले जात आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट; चेंगराचेंगरीतील मृतांना १० लाख, जखमींना अडीच लाखांची मदत जाहीर

जिल्ह्यात चर्चेत असलेले शेवगाव येथील अशोक लांडे खून प्रकरणात सध्या शिक्षा भोगत असणाऱ्या भानुदास कोतकर यांचे नाव बाजार समितीच्या नेप्ती येथील उपबाजाराला देण्यात आले होते. राजकीय, सामाजिक नेते, कार्यकर्त्यांची नावे देण्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्र मध्ये पूर्वी होती. मात्र 1987 साली पणन संचालकांनी याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आदेश जारी करत अशाप्रकारे नावे देता येणार नाहीत असे परिपत्रक काढले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी हा आदेश जारी केला आहे.

नामांतरला विधानसभाची किनार…दबक्या आवाजात चर्चा

लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय जा असला तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीची किनार या प्रकरणाला असल्याची चर्चा रंगली आहे. कारण कोतकर हे विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र न्यायालयीन अडचणी व वैयक्तिक कारण पुढे करत कोतकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र निवडणुकीत उतरण्याची त्यांची भूमिका अनेकांना अडचणीची ठरत होती, अशा देखील चर्चा नगरमध्ये सुरू होत्या. यातूनच आता या नामांतर प्रकरण समोर आले असल्याचे बोलले जात आहे.

 

follow us