Ahilyanagar MLC Election : माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा ! दत्तात्रय पानसरेंचा कलेक्टर ऑफिसमध्ये ठिय्या

Ahilyanagar MLC Election-पानसरे यांनी शहाबाज सय्यद यांना दिलेल्या प्राधिकृत पत्रावर दत्तात्रय पानसरे यांची स्वतःची स्वाक्षरी असल्याबाबत निवडणूक अधिकाऱ्याकडून खात्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Mlc Election Ahilyanagar

Mlc Election Ahilyanagar

Ahilyanagar MLC Election: अहिल्यानगर विधानपरिषदेच्या (Ahilyanagar MLC Election)निवडणुकीतून माघार घेण्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार गोंधळ उडाला आहे. अपक्ष उमेदवार करण ससाणे, कमलेश गांधी यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) यांची बिनविरोध निवड होण्यासाठी दत्तात्रय पानसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे आवश्यक होते. परंतु त्यांनी स्वतः उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. त्यांच्या प्रतिनिधीने उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे. त्याला पानसरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार गोंधळ उडाला आहे.

शहाबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पानसरे यांनी शहाबाज सय्यद यांना दिलेल्या प्राधिकृत पत्रावर दत्तात्रय पानसरे यांची स्वतःची सही असल्याबाबत निवडणूक अधिकाऱ्याकडून खात्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी दत्तात्रय पानसरे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. उमेदवारी अर्ज माघारीच्या अर्जावर खोटी सही करून अर्ज दाखल केल्याचा आरोप दत्तात्रय पानसरे यांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी आत्महत्येचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात दिला. त्यावेळी जोरदार गोंधळ पाहायला मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब नाहाटा यांनी पानसरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध झाले असल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. परंतु प्रशासनाने मात्र अजून ते जाहीर केलेले नाही.


पालकमंत्री विखे गेस्ट हाऊसवर ठाण मांडून

जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे गुरुवारी दुपारी गेस्ट हाऊसवर दाखल झाले. तोपर्यंत करण ससाणे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला होता. परंतु दत्तात्रय पानसरे यांनी उमेदवार अर्ज माघार घेतण्यास नकार दिला. परंतु त्यांच्या प्रतिनिधीने पत्र देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विखे जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या सरकारी विश्रामगृहावर परिस्थितीचा आढावा घेत होते.

Exit mobile version