Apmc election Ahmednagar : नगर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांच्या ताब्यात आली आहे. चौथ्यांदा कर्डिले गटाची सत्ता या बाजार समितीमध्ये आली आहे. सर्व अठरा जागा कर्डिले गटाने जिंकल्या आहेत. कर्डिलेंच्या विरोधात एकवटलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) हा मोठा धक्का आहे. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव करत मतमोजणी केंद्रावरच विजयी सभा घेतली. या सभेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुजय विखे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बाजार समितीमध्ये भाजप-शिवसेना एकत्रितपणे लढले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात बहुतांश बाजार समितीमध्ये विजय मिळाला आहे. उत्तर महाराष्ट्रात नगरची सर्वात मोठी बाजार समिती आहे. शिवाजीराव कर्डीले यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आहे. 18 विरुद्ध 0 असा विजय मिळाला आहे.
कर्जतमध्ये ट्वीस्ट ! Rohit Pawar-Ram Shinde गटाला समान जागा ! सभापती होणार कसा ?
पुढं म्हणाले की पाथर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती तिथं सत्तांतर झाले आहे. आमच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी राष्ट्रवादीकडून सत्ता काढून पुन्हा एकदा भाजपकडे सत्ता आणली आहे. श्रीगोंद्यात पक्षाच्या चिन्हावर निवडणूक नव्हती. काँग्रेस आणि भाजप एकत्र होते. राष्ट्रवादी आणि निम्मा भाजप तिकडे होता. अशी एकत्रिपणे निवडणुक झाली. तिथं सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातात आहेत. ज्याला भाजपचा कौल असेल तोच श्रीगोंदा बाजार समितीचा सभापती होणार, असे खासदार विखे पाटील यांनी सांगितले.
कर्जतमध्ये भाजपाचा सत्ता आली आहे. राम शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपचा सभापती होईल. काही ठिकाणी यशाची अपेक्षा होती पण तिथं आम्हाला म्हणावं तस यश मिळालं नाही. राहुरीत आम्ही प्रयत्न केला. पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता होती. तरी देखील आमचे दोन संचालक निवडून आले आहेत. पारनेरमध्ये सर्वजण एकत्र होऊन भाजपाच्या विरोधात लढले. आम्ही चांगला संघर्ष केला. आम्ही समाधानी आहेत, असे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.