Download App

कर्डिलेंविरोधात पुतण्याने ठोकला शड्डू, माजी खासदाराचा नातूही रिंगणात

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Apmc Election: नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 193 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. १६ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. व्यापारी मतदारसंघातून सुप्रिया कोतकर व राजेंद्र बोथरा यांची बिनविरोध निवड झाली. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचे शिवाजी कर्डिलेविरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे.

Apmc Election Karjat Jamkhed : जामखेड बाजार समिती निवडणूक, भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

ग्रामपंचायत व सेवा संस्था मतदारसंघातील १५ जागांसाठी भाजप व महाविकास आघाडीत काट्याची टक्कर होणार आहे. ही बाजार समिती कर्डिले यांच्या ताब्यात होती. पण यंदा महाविकास आघाडीकडून जोरदार टक्कर देण्यात येत आहे. कर्डिले यांनी १६ जुन्या संचालकांना डच्चू देत नव्याला संधी देण्यात येत आहे. महाविकास आघाडीने केवळ सेवा संस्था व ग्रामपंचायत विभागातील १५ जागांसाठी उमेदवार दिल्याने आता या जागांसाठी भाजप व महाविकास आघाडीत काट्याची लढाई होणार आहे.

राणेंचं आव्हान, संग्राम जगतापांचं प्रतिआव्हान

कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तेही बाजार समितीचे उमेदवार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिलेविरोधात पुतण्याने शड्डू ठोकला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसले मानणारे अंकुश शेळके यांना उमेदवारी देण्यात आली. स्वर्गीय दादा पाटील यांचे ते नातू आहेत. अंकुश यांच्या रुपाने शेळके कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात आली.

काही नवीन चेहऱ्यांना महाविकास आघाडीने संधी दिली आहे. या बाजार समितीमध्ये कर्डिले यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले आहेत.

कर्डिले गटाचे उमेदवार-सेवा सोसायटी : संजय गिरवले, सुधीर भापकर, राजेंद्र आंबेकर, रभाजी सूळ,मधुकर मगर, भाऊसाहेब भोर, सुभाष निमसे, महिला राखीव : आचल सोनवणे, मनिषा घोरपडे, एनटी ; धर्मनाथ आव्हाड, ओबीसी : संतोष म्हस्के- ग्रामपंचायत-भाऊसाहेब बोठे,
हरीभाऊ कर्डिले, दत्ता तापकीर ( दुर्बल घटक).
महाविकास आघाडीचे उमेदवार– सेवा संस्था ( सर्वसाधारण ) : उद्धव दूसुंगे, संदेश कार्ले, रोहिदास कर्डिले ,रा .वी. शिंदे ,अजय लामखडे ,संपतराव म्हस्के ,भाऊसाहेब काळे, महिलाराखीव : राजश्री लांडगे ,संगिता ठोंबरे, एन टी : विठ्ठल पालवे, ओबीसी, शरद झोडगे- ग्रामपंचायत ( सर्वसाधारण ) : अंकुश शेळके,शरद पवार, प्रविण गोरे ( दुर्बल घटक), सुरेखा गायकवाड ( अनुसुचित जाती ).

Tags

follow us