Apmc Election Karjat Jamkhed : जामखेड बाजार समिती निवडणूक, भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर
Apmc Election Karjat Jamkhed : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर यांचा भाजपच्या उमेदवारांच्या यादीत समावेश झाल्याने कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व जामखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजप प्रणित स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलची घोषणा करण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बळीराम यादव यांच्या नावामुळे ही निवडणूक रंगणार आहे. उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार सहकारी सोसायटी मतदार संघातून – मंगेश जगताप, अभय पाटील, काकासाहेब तापकीर, प्रकाश शिंदे, रामदास मांडगे, भरत पावणे, नंदकुमार नवले, महिला राखीव – विजया गांगर्डे, लिलावती जामदार, ग्रामपंचायत मतदार संघ – सुरेश मोढळे, बलिराम यादव, अनुसूचित जाती/जमाती – बाळासाहेब लोंढे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – सभाजी बोरुडे, इतर मागासवर्गीय – नितीन पाटील, व्यापारी/आडते मतदार संघ – अनिल भंडारी, कल्याण काळे, विमुक्त जाती/भटक्या जमाती- लहू वतारे, हमाल/मापाडी मतदार संघ – बापूसाहेब नेटके आदिंची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का; बाजार समितीच्या रणधुमाळीत तालुकाध्यक्षच फोडला !
जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलचे सोसायटी मतदार संघ – गौतम उतेकर, तुषार पवार, गणेश लटके, सचिन घुमरे, विष्णू भोंडवे, जालिंदर चव्हाण, मच्छिंद्र गिते, ग्रामपंचायत मतदार संघ – वैजीनाथ पाटील, शरद कार्ले, अनुसूचित जाती/जमाती- सिताराम ससाणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – नंदकुमार गोरे, महिला राखीव – शारदा भोरे, सुरेा शिंदे, व्यापारी/आडते मतदार संघ – प्रलंबित घोषणा, हमाल/मापाडी मतदार संघ – रविंद्र हुलगुंडे, विमुक्त जाती / भटक्या जमाती – अशोक महारनवर आदिंची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.