Download App

नव्या राजकीय समीकरणामुळं BJP च्या ‘या’ आजी-माजी आमदार आणि खासदारांमध्ये धाकधुक

अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीत उभी फुट पडली. अजित पवार यांच्याबरोबर विदर्भाच्या राजकीय क्षेत्रात वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे खासदार प्रफुल्ल पटेल देखील गेले. त्यामुळे विदर्भातील गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील भाजपच्या आजी-माजी खासदार, आमदारांची जीव भांड्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. या संदर्भात भाजपमधील नेते जाहीरपणे बोलत नसले तरी या राजकीय घडामोडीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता पहावयास मिळत आहे. (Ajit pawar and prafull patel BJP leaders are upset)

गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात वजनदार नेते म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे. खासदार प्रफुल्ल पटेल म्हणजे राष्ट्रवादी असे देखील मानले जाते. त्यामुळे राज्यस्तरावर राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडली असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांचीच राष्ट्रवादी काँग्रेस मानली जाते. दोन दिवसापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पुढारी शिंदे-फडणवीस सरकारात सामील झाले. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकाही भाजपच्या सोबतीने लढवण्याचं जाहीर केलं आहे.

स्टीव्ह स्मिथ सचिन आणि द्रविडच्या पुढे, 100 व्या कसोटीत रचणार इतिहास 

आगामी काळात विधानसभा व लोकसभा निवडणुका होणार आहेत. या जिल्ह्यातील भंडारा-गोंदिया व गडचिलोरी या दोन्ही लोकसभा त्याच बरोबर गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सातही विधानसभा भाजप लढविते. मात्र आगामी होणाऱ्या निवडणुकीत भाजपमध्ये हिस्सेदारी येणार हे निश्चित मानले जात आहे. गोंदिया जिल्हा दोन लोकसभा क्षेत्रात मोडतो. भंडारा-गोंदिया व गडचिरोली हे दोन लोकसभा क्षेत्र आहेत. या दोन्ही लोकसभा क्षेत्रात भाजप निवडणूक लढवते. त्या अनुषंगाने भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक लढविणारे इच्छुक कामाला लागले होते. विद्यमान खासदार सुनिल मेंढे यांनी गेल्या काही दिवसांपासून आपला जनसंपर्क वाढवला आहे. तर दुसरीकडे गडचिरोलीचे खासदार जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात आयोजित कार्यक्रमात हजेरी लावत होते. ते काही दिवसांपासून जिल्ह्यात जनसंपर्क वाढवित आहेत.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या नवे राजकीय समिकरणामुळे दोन्ही लोकसभा क्षेत्राची निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांमध्येही धाकधुक वाढली.

याशिवाय, गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव व देवरी- आमगाव या चार विधानसभा आहेत. यातील आमगाव-देवरी या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व नाही. तर तिरोडा व अर्जुनी मोरगाव या दोन विधानसभा आघाडीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असे. या दोन्ही विधानसभा क्षेत्रात आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा राहणार. गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्येही NCP आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या बेतात राहणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने गेल्या ५ वर्षापासून आटापिटा करणाऱ्या इच्छुक आजी-माजी आमदारांचे जीव टांगणीला आहे.

Tags

follow us