स्टीव्ह स्मिथ सचिन आणि द्रविडच्या पुढे, 100 व्या कसोटीत रचणार इतिहास

  • Written By: Published:
स्टीव्ह स्मिथ सचिन आणि द्रविडच्या पुढे, 100 व्या कसोटीत रचणार इतिहास

अॅशेस 2023 चा तिसरा कसोटी सामना रविवारपासून खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आपली 100वी कसोटी खेळणार आहे. स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत 99 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. 99 कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथच्या आसपास कोणीही नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या यादीत स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथने 99 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 9113 धावा केल्या आहेत. तर या खेळाडूची सरासरी 59.56 आहे. याशिवाय त्याने आतापर्यंत 32 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.( steve-smith-stats-sachin-tendulkar-rahul-dravid-aus-vs-eng)

राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजांपेक्षा स्टीव्ह स्मिथ पुढे!

बाकीच्या खेळाडूंवर नजर टाकली तर भारताचा दिग्गज राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडने 9 कसोटी सामन्यांनंतर 8492 धावा केल्या होत्या. राहुल द्रविडची सरासरी 58.16 होती. याशिवाय 99 कसोटी सामन्यांनंतर राहुल द्रविडच्या नावावर 22 शतके आहेत. त्याचबरोबर या यादीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने 99 कसोटी सामन्यांनंतर 57.99 च्या सरासरीने 8351 धावा केल्या. त्याचबरोबर पाकिस्तानचा जावेद मियांदाद या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा जावेद मियांदाद या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या जावेद मियांदादने 99 कसोटी सामन्यांनंतर 56.76 च्या सरासरीने 7549 धावा केल्या होत्या. तसेच, त्याने 21 शतके झळकावली होती.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

या यादीत कोणाचा समावेश आहे…

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी जॅक कॅलिस पाचव्या क्रमांकावर आहे. जॅक कॅलिसने 99 कसोटी सामन्यांनंतर 56.40 च्या सरासरीने 7840 धावा केल्या. जॅक कॅलिसने 99 कसोटी सामन्यांनंतर 24 शतके ठोकली. याशिवाय या यादीत रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारा अनुक्रमे सहा आणि सातव्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने 99 कसोटी सामन्यांनंतर 56.27 च्या सरासरीने 7990 धावा केल्या. रिकी पाँटिंगने 99 कसोटी सामन्यांनंतर 26 शतके केली होती. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने 99 कसोटी सामन्यांनंतर 55.66 च्या सरासरीने 8572 धावा केल्या. कुमार संगकाराने 99 कसोटी सामन्यांनंतर 25 शतके झळकावली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube