Ajit Pawar : ‘आश्वासन दिलेल्या बैठका तरी घ्या’, विधानसभेत अजितदादांनी मंत्र्यांना खडसावले

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. पण सभागृहातील कामकाज व्यवस्थित न चालल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी मंत्र्यांनी नियोजित केलेल्या बैठका आता तरी  वेळेवर घ्याव्यात, या मुद्द्यावरुन मंत्र्यांना धारेवर धरले आहे. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 03T115301.444

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 03T115301.444

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. पण सभागृहातील कामकाज व्यवस्थित न चालल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी मंत्र्यांनी नियोजित केलेल्या बैठका आता तरी  वेळेवर घ्याव्यात, या मुद्द्यावरुन मंत्र्यांना धारेवर धरले आहे.

यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत, ही बाब अत्यंत संतापजनक आहे, असे म्हणत त्यांनी विधानसभेत मंत्र्यांना सुनावले. अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्ते पणासाठी ओळखले जातात.  सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका किमान पुढच्या आधिवेशनाच्या पूर्वी तरी लावण्याची मागणी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्व सदस्यांच्या भावना सभागृहात मांडल्या.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सदस्य सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करुन मांडत असतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित मंत्री सभागृहात याविषयी बैठकी घेण्याचे आश्वासन देत असतात. मात्र आश्वासन दिलेल्या अनेक बैठका घेतल्याच जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत, त्यावर कोणताही मार्ग निघत नाही. त्यामुळे सभागृहात सदस्यांना बैठका घेण्याचे दिलेले आश्वासन पाळले जावे,‍ किमान पुढचे अधिवेशन येईपर्यंत तरी बैठकींचे आयोजन केले जावे. अध्यक्षांनी तसे निर्देश सरकारला देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

हल्ल्यामागे कुणाचा हात, हे सगळ्यांनाच माहित; संदीप देशपांडेंचा रोख कुणाकडे ?

Exit mobile version