Download App

तुम्हीच मुलं आणा! महिलेच्या प्रश्नावर दादांचं मिश्कील उत्तर अन् एकच हशा; नेमकं काय म्हटले?

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar  Baramati Speech : मी पहाटे लवकर उठून कामं करतो. आज सहा वाजता एक कार्यकर्ता कागद घेऊन आला. आमदार झोपलेले असतात, तेव्हा माझ्याकडं लोक कामं घेऊन येतात. आज एक भगिनी माझ्याकडं आली आणि म्हणाली, दादा खराडवाडीत कॉलेज काढा. मी म्हणालो, खराडवाडीत कॉलेज कसं निघणार? किती छोटंसं गाव आहे हे. मुलं-मुली कुठून आणायची? तर ती म्हणाली, दादा तीही तुम्हीच आणा… आता माझं वय झालं, नाही तर मी आणलीच असती मुलं, असं मिश्किल विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं. ते बारामतीत बोलत होते.

भाजपच्या आमदार-खासदारांना एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय का? अतुल लोंढेंचा सवाल 

अजित पवार गटाचा आज कार्यकर्ता मेळावा झाला. त्यावेळी त्यांनाी शरद पवार गटावरही टीका केली. ते म्हणाले, आता इथून पुढं फक्त माझं ऐका, इतर कोणाचंही ऐकू नका. बाकीच्याचं लय वर्ष तुम्ही ऐकलं. आता माझं ऐका. बऱ्याचं जणांनीही त्यांचं ऐकलं. प्रत्येकाचा एक उमेदीचा काळ असतो. आम्ही आमच्या वरिष्ठांना अनेकवेळा सांगितले की, आजपर्यंत तुम्ही म्हणाल तसं वागलो. तुम्ही सांगाला ती कामं केली. आता वय झलं. तुम्ही आम्हाला मार्गदर्शक केलं पाहिजे, अशी टीका अजितदादांनी पवारांवर केली.

Brijbhushan Sharan Singh यांनी साक्षीचे आरोप फेटाळले; संजय सिंह निकटवर्तीय नसल्याचा दावा

पुढं बोलतांना अजित पवार म्हणाले, बारामतीकरांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळं मी अर्थमंत्री, नियोजनमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे. आता आपल्या शब्दाला वजन आलं. आज माझे अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. याआधी मी सतत मागं असायचो. पण, आता आता मोठ्या लोकांशी संबंध येत आहेत. काम होत आहेत. आज मी सत्तेत नसतो तर मला विकासाची काम करायला जमली असती का? असं अजित पवार म्हणाले.

इकडंपण- तिकडपणं, असं चालणार नाही
आजपर्यंत तुम्ही मला भरभरून आशीर्वाद दिले. आता तुम्हाला थोडी कठोर भूमिका घ्यावी लागले. तुम्ही एक कुठंतरी थांबल पाहिजे. इकडंपण आणि तिकडपणं, असं चालणार नाही. ज्यांना माझ्याकडे यायचे आहे त्यांनी यावे, ज्यांना इतर ठिकाणी जायंचं त्यांनी खुशाल जावं, पण मी सत्तेत असल्यामुळं बारामतीचा विकास करू शकतो. मी कोणत्याही कामात कमी पडणार नाही, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, आपण महिलांना संधी देत ​​आहोत. आपण चौथं महिला धोरण आणलं. जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याला त्याच्या वडिलांचे नाव दिले जाते. स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव जोडण्याची परंपरा आहे. पण आता इथून पुढ मुलांचं नाव, त्यानंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव लावलं जाणार, तसा निर्णय घेतला, असंही अजित पवार म्हणाले.

Tags

follow us