पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो : अजित पवारांनी ठणकावून सांगितले

पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो : अजित पवारांनी ठणकावून सांगितले

Ajit Pawar : आता आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहायचं आहे. त्यात कुठेही मॅचफिक्सिंग नाही, आपण भूमिका घेतलीय त्यामध्ये बदल होणार नाही, असं मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभमीवर अजित पवार गटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्मक कामावर लक्ष द्या. कारण लोकसभेनंतर चार महिन्यांतच विधानसभा निवडणुका लागणार आहेत, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवदींच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अजित पवार यांच्यासह सुनिल तटकरे उपस्थित होतं.

आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्यांना वाटतं हे एक आहेत. कशाला वाईटपणा घ्यायचा असं तुम्हाला वाटत असेल, पण आता आपण पुढं आलो आहेत. कुठेही कसलीच मॅचफिक्सिंग नाही. आता आपल्याला कोणालाही फसवायचं नाही. जी भूमिका घेतली, त्यात आता कोणताही बदल होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं अजित पवार यांनी सांगितले.

…तर आपणच आपल्या पायावर दगड पाडल्यासारखं होईल, जरांगेंच्या डेडलाईवर शंभुराज देसाईंनी सुनावले

मार्च महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्मक कामावर लक्ष द्या. लोकसभेनंतर लगेच चार महिन्यात विधानसभा निडणुका होणार आहेत. आता लोकसभा महत्त्वाची आहे. पण निवडणुकांनंतर विधानसभेची तयारी केली पाहिजे. आपण आतापर्यंत लोकसभेच्या सर्वाधिक सहा-नऊ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

लोकसभेपूर्वीच भाजपनं ठोकला मोदींच्या विजयाचा शड्डू; विरोधकांना स्लोगनमधून दिलं चॅलेंज

बोलताना आणि चर्चा करताना महायुती मित्र पक्ष नाराज होणार नाहीत, याची काळजी घ्या. कुठं मित्र पक्ष चुकत असेल तर आम्हाला सांगा पण महायुतीत अंतर पडेल किंवा गैरसमज होईल, असं काही वागू नका. कोणी विचारलं तर वरिष्ठ निर्णय घेतील असंच सांगा. आग लावण्याचे प्रयत्न कोणीही करुन नका. कोणी प्रयत्न करत असेल तर वाद वाढवायच्या ऐवजी विझवायचं काम करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube