मुख्यमंत्री सचिवालयात बाहेरील सहा उमेदवारांची ओएसडीपदी नेमणूक; आरटीआयमध्ये मोठा खुलासा
Chief Minister’s Secretariat OSD : राज्य सरकारच्या विविध विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तब्बल दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहे. सरकारकडून भरती प्रक्रिया राबवली जात नसल्यानं शासकीय विभागात पुरेसं मनुष्यबळाचा अभाव आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री सचिवालयातील (Chief Minister’s Secretariat) ९ ओएसडी (OSD) पैकी ६ उमदेवार हे बाहेरील असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
…तर आपणच आपल्या पायावर दगड पाडल्यासारखं होईल, जरांगेंच्या डेडलाईवर शंभुराज देसाईंनी सुनावले
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला. त्यात त्यांनी सांगितले की, आपण महाराष्ट्र शासनाकडे मुख्यमंत्री सचिवालयातील ओएसडींची माहिती मागवली होती. या माहितीनुसार, मुख्यमंत्री सचिवालयातील एकूण 9 OSD पैकी 6 उमेदवार हे बाहेरील आहेत. तर फक्त 3 OSD सरकारी अधिकारी आहेत.
गलगली यांनी पुढं बोलतांना सांगितलं की, कसरकारी सेवेत नसलेल्या ६ उमदेवारांना ओएसडीपदी नियुक्त करण्यात आलं. ओएसडीच्या शैक्षणिक माहिती मागवली असता, ओएसडींच्या शैक्षणिक माहीती उपलब्ध झाली नाही. ती माहिती मुख्यमंत्री सचिवालयातून प्राप्त करून घेण्याचा सल्ला दिला आहे. या ओएसडींचं वेतन आणि कामाचं मुल्यांकन करणं गरजेच आहे. सरकारला विनंती आहे, या ओएसडी सारखी महत्वाची पदं स्थायी स्वरुपात भरावी. शिवाय, या ओएसीडींची ची माहिती सार्वजिनक करावी, अशी विनंती गलगली यांनी केली.
काँग्रेस नेते सुनील केदारांना मोठा धक्का; नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा
दरम्यान, सहा ओएसडी उमेदवार बाहेरील आहेच. मंगेश चिवटे, विनायक पात्रुडकर, आनंद माडिया, आशिष कुलकर्णी, अमित हुक्केरीकर आणि मारुती साळुंखे यांचा समावेश आहे. तर 3 सरकारी अधिकाऱ्यांमध्ये डॉ. राजेश कावळे, डॉ. राहुल गेठे आणि डॉ. बालसिंग राजपूत यांचा समावेश आहे.