Ajit Pawar : अजित पवार सरकारमध्ये सहभागी होऊन (Ajit Pawar) पाच महिने उलटून गेले आहेत. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री त्यानंतर पु्णे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी मिळवलं. तरीही सरकारमध्ये ते नाराज असल्याच्या बातम्या येतच असतात. मध्यंतरी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशाही बातम्या येत होत्या. यानंतर आता अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कर्जत येथील मेळाव्यात ते बोलत होते. आधी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर तुमच्या मनात येईल ते होईल असे अजित पवार म्हणाले. या वक्तव्यातून त्यांनी एक प्रकारे मुख्यमंत्रीपदाचेच संकेत दिल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मला डेंग्यू झाला तेव्हा अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला अशी चर्चा झाली. पण मी असा काही लेचापेचा माणूस नाही. जे आहे ते तोंडावर आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
NCP Crisis : राष्ट्रवादी आमचीच! ‘त्या’ नोटिसीला अजित पवार गटाचं 260 पानांचं उत्तर
अजित पवार म्हणाले की इथले तरुण वेगवेगळ्या घोषणा देत होते, त्याबद्दल काही काळजी करु नका. पहिले लोकसभेची निवडणूक आहे. नंतर जे तुमच्या मनात आहे ती निवडणूक आहे. अलिकडच्या काळात विरोधी पक्षाचे लोक रोज काहीतरी बोलत असतात, आपण प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही. आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहोत, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचेच संकेत दिले अशी चर्चा होत आहे.
आमच्या वरिष्ठांनी आमचं कधीच ऐकलं नाही
राज्यात सातत्याने राजकीय सभा होत आहेत. पण विधानसभा निवडणूक लवकर होईल, अशी शंका मनात ठेऊ नका, असे अजित पवार यांनी म्हटले. ते पुढं म्हणाले की लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करावा लागतो. हे आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगत होतो. पण आमचं एकलं नाही. राज्यकीय भूमिका घ्याव्या लागतात. नितीश कुमार, जयललिता, ममता बॅनर्जी यांनीही त्या त्या राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घेतल्या. राज्यात देखील अनेकवेळा काही भूमिका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळं परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे आपण देखील घेतला आहे, असेही अजित पवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक होणार की नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितले..