Download App

अजित पवारांनी जयंत पाटलांना फोन करणं टाळलं, आता म्हणाले, ‘मी त्यांना भेटेन….’

Ajit Pawar explained why he did not call Jayant Patil : IL&FS च्या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची ईडीने (ED) सोमवारी साडेनऊ तास चौकशी केली. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ईडीला सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, जयंत पाटील यांच्या चौकशीनंतर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांनी त्यांना फोन केले. मात्र अजित पवारांचा फोन आला नसल्याची माहिती खुद्द जयंत पाटील यांनी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये पुन्हा नाराजीची चर्चा सुरू झाली. मात्र, आता या चर्चेवर खुद्द अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यांतर मविआच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करण्याचे टाळले होते. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, ‘ज्या वेळ पासून आम्ही सत्तेत आहे, कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात मी वक्तव्य केलं? जयंत पाटील यांनाच ईडीने चौकशीसाठी बोलावले नाही. यापूर्वी ईडीने अनेक नेत्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. छगन भुजबळ, अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल या नेत्यांची ईडीने चौकशी केली आहे. त्यावेळी मी काही वक्तव्य केलं असेल तर मला दाखवा. मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर प्रतिक्रिया देत नाही. तुम्ही मुद्दाम काही अर्थ काढण्याचा प्रयत्न करता, असं अजित पवार म्हणाले आहेत.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरे रवाना

माझ्या बाबतीतही आयकर विभागाने २२ ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी मला जे सांगायचे होते ते मी बोललो आहे. त्यानंतर मी माझे काम पुन्हा सुरू केले. तपास करणार्‍या यंत्रणांना तपासाचे अधिकार आहेत. या यंत्रणांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर नेते पूर्ण सहकार्य करतात. मी जयंत पाटलांना फोन कशाला जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा मी त्यांना बोलनं असंही पवार म्हणाले.

तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. मात्र, भाजपमध्ये गेल्यांची चौकशी होत नाही. सूडभावनेतून चौकशीला बोलवणं चुकीचं. मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर प्रतिक्रिया देत नाही. भुजबळ आणि मलिक यांच्या प्रकरणावरही मी बोललो नाही. जयंत पाटील यांना फोन कशाला, जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा मी त्यांना बोलेन असंही अजित पवार म्हणाले

Tags

follow us