Download App

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री होऊन, गुरूपौर्णिमेला पवारांना गुरूदक्षिणा दिली; भुजबळांच्या विधानाला दादांचा दुजोरा

NCP Political Crises : रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी एकनाथ शिंदेंप्रमाणेच बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज अजित पवारांकडून संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात झाली आहे. यानुसार काही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर काहींची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री छगन भुजबळ देखील त्यांच्या सोबत होते. यावेळी त्यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेने सगळ्यांचे लक्ष वेधले. ( Ajit Pawar gives Grudakshina to Sharad Pawar on Gurupaurnima Says Chagan Bhujbal )

शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष, विसरलात का? अजितदादांचा पत्रकारालाच प्रश्न

काय म्हणाले छगन भुजबळ?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजवळ, रूपाली चाकणकर, सुनिल तटकरे, अमोल मिटकरी, यांची उपस्थिती होती यावेळी पत्रकारांनी मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला की, गुरूपौर्णिमेच्याच दिवशी गुरूंचा निर्णय न मानून अजित पवारांनी ही शरद पवारांना गुरूदक्षिणा दिली आहे का? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, गुरूपौर्णिमेच्याच दिवशी उपमुख्यमंत्री होऊन शरद पवारांना गुरू गुरूदक्षिणाच दिली आहे. तर यावर अजित पवार देखील म्हणाले की पक्ष सत्तेत आणला ना? असं म्हणत भुजबळांच्या विधानाला दुजोरा दिला आहे.

रुपाली चाकणकर थेट अजितदादांच्या व्यासपीठावर; तटकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी

त्याचबरोबर यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी खासदार सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

पटेल म्हणाले, अजित पवारांकडून संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात झाली आहे. यानुसार आता जयंत पाटलांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटविण्यात आले असून सुनिल तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत पाटील यांची तेव्हा तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केली होती. आता मी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष या नात्याने सुनिल तटकरे यांची नियुक्ती करत आहेत. आता जयंत पाटील यांनी त्यांच्या पदाची सुत्रे तटकरे यांच्याकडे सुपुर्द करावी. आता इथून पुढे पक्षाचे अध्यक्ष या नात्याने सुनिल तटकरे हे नियुक्त्या करतील. असं देखील सांगण्यात आलं आहे.

Tags

follow us