शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष, विसरलात का? अजितदादांचा पत्रकारालाच प्रश्न

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 03T181130.275

Ajit Pawar On Sharad Pawar :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेते आहेत. ( Ajit Pawar Vs Sharad Pawar Political Crisis )  या घटनेमुळे राष्ट्रवादीमध्ये उभा संघर्ष पहायला मिळत आहे. अजित पवारांनी आम्ही राष्ट्रवादीतच आहोत आणि पक्ष व चिन्ह हे आमच्याचकडे आहे, असे म्हटले आहे.

अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत  जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागेवर सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजित पवारांनी शरद पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे विसरलात का, असा टोला अजितदादांनी पत्रकारालाच लगावला.

जयंत पाटलांना नारळ; सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष : अजित पवारांचा गट अॅक्टिव्ह मोडवर

तसेच बहुसंख्य आमदार आमच्या बरोबर आहे म्हणून अजित पवार इथे उपमुख्यमंत्री म्हणून इथं बसला आहे, असे अजितदादा पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच काल काहींनी त्या 9 जणांच्यावर कारवाई करावी, असे म्हटल्याचं मी पाहिलं. पण निलंबनाचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा आहे.  मला आमदारांनी विधीमंडळ पक्षाचा गटनेता ठरविले आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना निलंबित करावे, असे पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांना कालच दिले आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना झटका; शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई

यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांचा निर्णय आम्हाला लागू होत नाही. कारण आमच्याकडे बहुमत आहे. बहुसंख्य आमदारांचे व नेत्यांचे आम्हाला समर्थन आहे. कोणताही वाद होऊ नये असे आम्हाला वाटतं. वाद झाल्यास निवडणूक आयोग याचा निर्णय घेईल. आमच्या आमदार असल्याशिवाय शपथ घेतली नसती. त्यांनी सांगाव त्यांच्याकडे किती आमदार आहे, असे पटेल यांनी सांगितले.

Tags

follow us