Nilesh Lanke News : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये (Sharad Pawar group) प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर निलेश लंके यांनी या चर्चेला पूर्णविराम देऊन टाकला आहे. शरद पवारांची भेट झालीच नाही, या अफवा असल्याचं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिलं आहे. दरम्यान, अहमदनगर शहरातील कार्यालयात निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून निलेश लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेच असू शकतात, अशा चर्चांना ऊत आला होता. निलेश लंकेंकडूनही त्यानूसार तयारी सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. नूकतंच निलेश लंके यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या महानाट्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे खासदार आणि संभाजीराजे फेम अभिनेते अमोल कोल्हे यांनी लवकरच भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन लंके यांना केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लंकेंच्या शरद पवार गटाच सामिल होण्याचा दुजोराच मिळाला होता. मात्र, आज निलेश लंके यांनी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पक्षाने जबाबदारी दिली तर मैदानात उतरणार :
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत अजून माझं असं काही ठरलेलं नाही. राजकारण क्षणात बदलत असतं त्यावर आत्ता चर्चा करणं यात काही तथ्य नाही. राजकारणात आता काय होणार आहे हे माहित नसतं थोड्या वेळात काय होणार हेही माहित नसतं
राजकारण कधीही कोणत्याही वळणावर जाऊ शकतं त्यामुळे त्यावर आधी बोलणं मला योग्य वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षाने जबाबदारी दिली तर मैदानात खेळाडूसारखा लढणार असल्याचं निलेश लंके यांनी ठणकावून सांगितलं आहे.
मी मोठा नाही फोन नॉट रिचेबल व्हायला…
मी एवढा मोठा माणूस नाही माझा फोन नॉट रिचेबल व्हायला. माझी तब्येत खराब आहे. काल, परवा उशिरापर्यंत मला लोकं येऊन भेटत होते. मला गोळ्या औषधे सुरु आहेत. आमच्या निवडीवर काही नसतं पक्षाच्या नेतृत्वावर असतं. समाजाला काय वाटतं ही भावना महत्वाची आहे. शरद पवारांचे फोटो कार्यकर्ते लावतात. मला जो प्रोटोकॉल आहे, तसा कार्यकर्त्यांना नाही.
त्यांना या जाहिरातीचे काय परिणाम होऊ शकतात याची माहिती नसते. आम्ही प्रोटोकॉलनूसार नेतृत्वांचे फोटो लावत असल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, प्रत्येक नेता कार्यकर्ता त्याच्या पद्धतीने काम करीत असतो कोणाचं काय काम? यापेक्षा आपल्या कामाला आपण महत्व द्यायचं, त्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष वाढवायची असते. एक बोट दुसऱ्याकडे दाखवलं की आपल्याकडे चार बोट असतात त्यामुळे आपण आपलं काम करीत रहायचं, असं म्हणत निलेश लंके यांनी नगरचे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यावर बोलणं टाळलं आहे.