Sanjay Raut News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट (Ncp Group) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. खासदार शरद पवार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र बसून निर्णय घेतली. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालंय. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आतली गोष्ट सांगितलीयं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल असं मला वाटत नसल्याचं संजय राऊतांनी लेटस्अपला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलंय.
पालिका निवडणुकांच्या तोंडावर केंद्राचा मास्टर स्ट्रोक; राज ठाकरेंच्या शिलेदाराची मागणी झटक्यात मान्य
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होईल असं मला वाटत नाही. शरद पवार यांनी हवेत पतंग उडवला आहे. आधीच राजकारण आणइ आत्ताचं राजकारण खूप बदललं असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय.
साई संस्थानच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय; समितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे…
प्रफुल्ल पटेलांना भाजपने पवित्र केलं…
अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दाऊद इब्राहिम आणि इक्बाल मिरची यांच्याशी व्यवहार केले आहेत. त्यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे, याउलट त्यांनी माझ्यावर कारवाई केलेली आहे. पण त्यांचे आरोप खोटे ठरलेले आहेत. प्रफुल्ल पटेलांना सोबत घेऊन भाजपवाल्यांनी त्यांना पवित्र केलं आहे. ही भाजपवाल्यांची लायकी असल्याची टीका संजय राऊतांनी केलीयं.
तुम्ही स्वत:चा पक्ष काढून उमेदवार निवडून आणून दाखवा…
कोणत्याही व्यक्तीचा पक्ष कोणी चोरुन घेऊन जात असतील तर कोणालाही वेदना होतीलच. तशाच वेदना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना झाल्या असतील. आमचा पक्ष चोरला म्हणूनच आम्हाला राग अमित शाहांचा राग आहे. अजित पवार गट आणि शिंदे गटाचे अमित शाह मालक झालेले आहेत. त्यांनी स्वत:चा पक्ष काढून उमेदवार निवडून आणून दाखवावेत, असं खुलं चॅलेंजचही संजय राऊतांनी यावेळी बोलताना दिलंय.
माझ्यावर कारवाईनंतर ईडीची हवा गेली…
विरोधकांमध्ये मी शेवटचा माणूस आहे, ज्याच्यावर ईडीची कारवाई झाली. तेव्हा त्यांच्याशी मी लढलो, आणि बाहेर आलो, कोणीतरी माणूस त्यांना भेटला की तो शरण आलेला नाही. त्यानंतर ईडीच्या कारवाया थांबल्या असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलंय.