Download App

Maharashtra Politics : ‘भाजपसह शिंदे गटालाही अजित पवारांचे खोचक टोले ; म्हणाले…

पुणे : पुण्यात कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. याशिवाय राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि ठाकरे गटामध्ये (Thackeray Group) सुरु असलेल्या संघर्षामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आज पुण्यातील कसब्यात बघायला मिळाला. चिंचवड मधील काही सहकाऱ्यांशी काही लोकांशी मला बोलायचं होतं. त्यामुळे आज मी वेगवेगळ्या बैठका ठेवलेल्या होत्या. निवडणूक म्हटल्यावर ते देखील त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करणारच पण त्यांनी बैठका का वाढवल्यात याबद्दल मला कल्पना नाही.

जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यापाठोपाठ आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचेही होर्डिंग्ज मुंबईत (Mumbai) झळकले आहेत. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर अजित पवार म्हणाले, असे काही होर्डिंग्स लावले असतील तर तुम्ही मनावर घेऊ नका. उद्या जर मी तुझही (पत्रकाराचे) भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्स लावलं तर, पण पण जोपर्यंत तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या होर्डिंग्स लावण्याला काहीही अर्थ नाही. ते फक्त कार्यकर्त्यांचे वैयक्तिक समाधान असतं.

अतिउत्साही कार्यकर्ते अशा काही गोष्टी करत असतात. पण लोकशाहीमध्ये अति उत्साहापेक्षा 145 ही जी मॅजिक फिगर आहे, त्याला जास्त महत्त्व आहे. आता जनता ठरवेल कुणाला 440 चा करंट द्यायचा, अशा फालतू प्रश्नांना उत्तर देऊन मला माझाही वेळ घालायचा नाही. आणि तुमचाही वेळ घ्यायचा नाही. ते स्वतः राज्यपाल असताना त्यांनी हे पत्र बाहेर काढायला हवं होतं किंवा आता जर बोलले असतील तर त्यांनी ते पत्र प्रेसला द्यावं. त्यामुळे हे पत्र सगळ्यांच्या वाचनात आल्यावर लोकांनाही कळेल की या पत्राचा काय अर्थ निघतो.

Tags

follow us