मोठी बातमी ! चंद्रशेखर बावनकुळेंवर पक्षाकडून मोठी जबाबदारी; ‘या’ राज्याच्या सहप्रभारीपदी नेमले

Chandrashekhar Bawankule: राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) संघटनात्मक सहप्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Chandrashekhar Bawankule (3)

Chandrashekhar Bawankule: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर भाजपने राष्ट्रीय पातळीवर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. राजस्थानमधील निवडणुकीसाठी भाजप (BJP) संघटनात्मक सहप्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राजस्थानमधील निवडणुकांसाठी सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार हरीश द्विवेदी हे प्रभारी असणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार गजेंद्रसह पटेल, खासदार संगीता यादव, रोहन गुप्ता, दिल्ली सरकारमधील मंत्री रविंद्र इंद्राजसिंह यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षसंघटनातस्तरावर अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी पक्षाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षाचे मुख्य निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात होती. त्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदेमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर राहिला होता. त्यांच्या पक्षसंघटनेतील कामाचा दांडगा अनुभव आणि शिस्तप्रिय कार्यपद्धती लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलाय. बावनकुळे यांनी यापूर्वी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही यशस्वीपणे काम पाहिले आहे.

follow us