Download App

अजितदादांना व्हायचंय मुख्यमंत्री; दिल्लीत लावली फिल्डिंग, पुण्यातले कार्यक्रम पुन्हा अचानक रद्द

Ajit Pawar met Amit Shah : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (maharshtra politics) खळबळ उडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) विरोधात गेला तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असे देखील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 8 एप्रिल रोजी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचा दावा एका इंग्रजी दैनिकाने केला आहे. त्यानंतर आज  पुन्हा अजित पवार यांचे पुण्यातील कार्यक्रम अचनाक रद्द करण्यात आले आहेत. यामुळे अजितदादा भाजपमध्ये जाणार का? या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. दोन आठवड्यापूर्वीदेखील अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले होते. त्यावेळी अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजितदादांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने ते राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

अजितदादांना खातेवाटप निश्चित केले?
मुक्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाविरोधात निकाल दिल्यास सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. अशात अजित पवारांना भाजपाबरोबर जात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, असा दावा एका वृत्तपत्रात करण्यात आला आहे. तसेच, दिल्लीला जाण्यासाठी अजित पवारांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला होता. अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 35 ते 40 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अमित शहांसोबतच्या बैठकीत संभाव्य मंत्रीपदाच्या खातेवाटपाबाबतही चर्चा झाली आहे, असे त्या वृत्तपत्रात म्हटले आहे.

पुण्यातले आजचे कार्यक्रम अचानक रद्द
एकीकडे अजित पवार यांच्याबाबत संशयाचे वातावरण असतानाच आज पुण्यातील अजितदादांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आज सासवड येथे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला अजित पवार आले नाहीत. तसेच आज सकाळी 8 वाजेपासून वडकी, फुरसुंगी या भागातील काही दुकानांचे उद्धाटन अजित पवार करणार होत, त्या ठिकाणीही अजित पवार आलेले नाहीत त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

ठाकरे गटाला धक्का! मविआचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला…

अजितदादांऐवजी शरद पवारांची उपस्थिती
आज सासवड येथील मेळाव्याला अजित पवार यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे अचानक समजल्याने नागरिकांमध्येही वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार होता.

Tags

follow us