ठाकरे गटाला धक्का! मविआचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला…

ठाकरे गटाला धक्का! मविआचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला…

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्यावाढीचा ठाकरे सरकारचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात रद्द करण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

“Amit Shah यांच्या वेळेमुळेच दुपारी कार्यक्रम; व्हीआयपी छपराखाली आणि…” संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई महापालिकेच्या प्रभागांची रचना 227 पर्यंतच कायम ठेवण्यात यावे, असे उच्च न्यायालायकडून देण्यात आले आहे. तत्कालीन महाविकास सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या प्रभागांची रचना केली.

Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल

प्रभागांची संख्या आधी 227 होती, त्यानंतर ही प्रभागांची संख्या 236 करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, महाविकास आघाडीचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्यानंतर न्यायालयाने सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय.

अतिक अहमदच्या हत्येनंतर पत्नी शाइस्ता परवीन आली शरण

उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सुनिल शुक्रे आणि एम डब्लू चांदवाणी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेली याचिकाही फेटाळण्यात आली आहे.

दरम्यान,राज्य सरकार आणि निवडणूक आयोगानं मांडलेली भूमिका उच्च न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube