अतिक अहमदच्या हत्येनंतर पत्नी शाइस्ता परवीन आली शरण
Atiq Ahmed’s Murder, His Wife Shaista Parveen Surrender : माफिया किंगपिन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस या दोघांना येथील वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना हा खून झाला. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी उमेश पाल हत्येतील आरोपी अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन रविवारी आत्मसमर्पण करू शकते. अशा बातम्या देखील येऊ लागल्या यानंतर आज अतिक अहमदच्या अंत्ययात्रेवेळी त्याची फरार असलेली पत्नी शाइस्ता परवीन हि पोलिसांना शरण आली.
अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन ही उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असून हत्येपासून यूपी पोलीस तिचा शोध घेत होते. उमेश पाल हत्येनंतर शाइस्ता परवीन वर 50000 रुपयांचे बक्षीस ठेवले होते. परंतु आपल्या पतीच्या अंत्ययात्रे दरम्यान शाइस्ता परवीन हि पोलिसांना शरण आली. शाइस्ता परवीनचा वकील विजय शर्मा यांनी या आगोदर शाइस्ता परवीन हि आज शरण येऊ शकते असे म्हंटले होते.
शाइस्ता परवीनचा पती अतिक अहमद याची शनिवारी उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र, घटनेनंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. याच्या दोनच दिवसांपूर्वी अहमदचा मुलगा असद झाशीमध्ये पोलिस चकमकीत मारला गेला होता. प्रयागराजमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही हत्या झाली. त्यावेळी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ आसराफ यांना पोलीस रुग्णालयात नेत होते. त्याच वेळी पत्रकारणसोबत असलेल्या तिघांनी गोळ्या झाडून अतिक अहमद व त्याच्या भावाची हत्या केली.