ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, आम्हाला कोट करून बोलू नका, या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी इतर पक्षांच्या प्रवक्त्यांना झापलं आहे. विशेष म्हणजे यावेळी बोलताना अजित पवारांचा रोख ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर होता. विधानभवनातून अजित पवारांनी संवाद साधला.यावेळी बोलताना कोणाचंही नाव न घेता अजित पवारांनी टोलेबाजी केलीय.
अजित पवारांमुळं ‘आयाराम’ भाजप नेत्यांमध्ये चलबिचल!
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत युती किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. या चर्चांवर इतर पक्षांच्या प्रवक्त्यांनी आपलं मत मांडलं होतं. त्यावर अजित पवारांनी संजय राऊतांना चांगलंच झापल्याचं पाहायला मिळालंय.
…तेव्हाच काँग्रेसवरची नाराजी दूर होईल, सत्यजित तांबेनी सांगितलं कारण
यावेळी बोलताना अजित पवारांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांसह इतर पक्षांच्या प्रवक्त्यांवर निशाणा साधला. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आमची भूमिका मांडण्यासाठी आमच्या पक्षाचा प्रवक्ते, नेते मजबूत असल्याचंही त्यांनी राऊतांना उद्देशून कडक शब्दांत सांगितलंय.
इतर पक्षाकडून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून नक्कीच सुरू आहे. मात्र आमदार फुटले तरी पक्ष फुटणार नाही. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांच्या नावाशी बांधलेला आहे. जसं शिवसेनेतून आमदार फुटले, मात्र पक्ष जागेवरच राहिला आहे. माझी पक्की माहिती आहे की ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या सर्व खोट्या आहेत.अजित पवार हे कुठेही जाणार नसल्याचं संजय राऊतांनी सकाळीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं. त्यावरुन अजित पवारांनी त्यांना झापलं आहे.
साडे अकरापर्यंत थांबा काय घडत ते पहा; राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंचे मोठं विधान
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय विश्लेषकांकडून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एकीकडे महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांची सुरु धूसफुस तर दुसरीककडे सत्तासंघर्षांची सुनावणी. महविकास आघाडीकडून राज्यात वज्रमूठ सभांचं आयोजन केलेलं असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी, ठाकरे गटाकडून भूमिका बदलली जात असल्याचं जाणवलं. याचदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आठ दिवसांत दोनदा दिल्ली दौरा करुन आले.
त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या घडामोडींनतर राजकारण महत्वाचे मानले जाणारे नेते अजित पवारांविषयी चर्चा सुरु होत्या. अजित पवार यांनी अमित शाहा यांची भेट घेतल्याच्याही चर्चा सुरु होत्या. एवढंच नाहीतर अजित पवारांना भाजपसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीच्या दोन आमदारांकडून जाहीर पाठिंबाही जाहीर करण्यात आला. अखेर अजित पवारांनी आज पत्रकार परिषदेत आपली स्पष्ट भूमिका मांडत जीव गेला तरी मी राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं ठामपणे सांगून टाकलं.